वेस्ट इंडीजच्या भारत दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर

४ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर दरम्यान चालणाऱ्या या दौऱ्यात २ कसोटी, ५ एकदिवसीय आणि ३ टी - २० सामने खेळवले जाणार आहेत.

india vs west indies
सौजन्य - इंडियन एक्सप्रेस

एशिया कप पार पडल्यानंतर अवघ्या सहा दिवसांनंतर वेस्ट इंडिज भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यात २ कसोटी, ५ एकदिवसीय आणि ३ टी – २० सामने खेळवले जाणार आहेत. सात आठवडे चालणाऱ्या या दौऱ्यात राजकोट येथे ४ ऑक्टोबरला पहिली टेस्ट मॅच खेळवली जाणार आहे. तर ११ नोव्हेंबरला चेन्नई येथे तिसरी आणि शेवटची टी-२० मॅच खेळवली जाईल.

वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यात आतापर्यंत ९४ टेस्ट मॅच खेळवल्या गेल्या आहेत. १९४८ पासून खेळवल्या गेलेल्या या सामन्यात वेस्टइंडीजने ३० सामने जिंकले आहेत तर २८ सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. त्याचसोबत ४६ सामने बरोबरीत देखील सुटले आहेत.

जेसन होल्डरकडे संघाचे कर्णधारपद 

वेस्ट इंडिजच्या क्रिकेट बोर्डाने भारत दौऱ्यासाठी आपला १५ जणांचा संघ जाहीर केला आहे. संघाचे कर्णधारपद जेसन होल्डरकडे आहे.

वेस्ट इंडिजचा संघ – जेसन होल्डर (कर्णधार), सुनिल अँब्रिस, देवेंद्र बिशु, क्रेग ब्रेथवेट, रोस्टन चेस, शेन डॉव्रिच, शेनॉन गॅब्रिएल, जहामार हॅमिल्टन, शिमरॉन हेटमेयर, शाई होप, अल्झारी जोसेफ, किमो पॉल, कायरन पॉवेल, केमार रोच, जोमिएल वारिकेन