घरक्रीडाकोरोननंतरच्या पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजचा इंग्लंडवर दणदणीत विजय

कोरोननंतरच्या पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजचा इंग्लंडवर दणदणीत विजय

Subscribe

गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जग लॉकडाऊन असताना आता हळूहळू काही देश पूर्वपदावर येऊ लागले आहेत. त्यातच कोरोना संकटानंतर आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात वेस्ट इंडिजचा विजय झाला असून त्यांनी यजमान इंग्लंड टीमचा पराभव केला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या चार महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटदेखील ठप्प होते. मात्र मागील आठवड्यात कोरोनानंतरचा पहिला कसोटी सामना खेळवण्यात आला.

- Advertisement -

इंग्लंड – वेस्ट इंडिजमध्ये सुरू झालेल्या कसोटी सामन्यात पाचव्या दिवशी वेस्ट इंडिजने इंग्लंडवर ४ गडी राखून विजय मिळवला आहे. २०० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चौथ्या डावात जेरमाइन ब्लॅकवूडने दमदार ९५ धावांची खेळी खेळत संघाला पहिला विजय मिळवून दिला. शेवटच्या दिवशी वेस्ट इंडिजने तीन गडी गमावले. क्रेग ब्रेथवेट, शाय होप आणि ब्रूक्स हे तिघे एकेरी धावसंख्येवर बाद झाले. पहिला गडी बाद झाल्यानंतर वेस्ट इंडिजला अजून एक धक्का बसला होता. जॉन कॅम्पबेल एका धावेवर खेळत असताना रिटायर्ड हर्ट होत तंबूत परतला. त्यानंतर रॉस्टन चेस आणि जेरमाईन ब्लॅकवूड या दोघांनी दमदार खेळी केली. चेस ३७ धावांवर बाद झाल्यावर ब्लॅकवूडने होल्डरच्या साथीने डाव पुढे नेला. ब्लॅकवूड ९५ धावांवर बाद झाल्यावर होल्डरने विजय मिळवून दिला.

हेही वाचा –

राजस्थान राजकारण : गेहलोत सरकार अल्पमतात; सचिन पायलट यांचा दावा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -