घरक्रीडावेस्ट इंडिज वर्ल्डकप जिंकण्याचा प्रबळ दावेदार - पोलार्ड

वेस्ट इंडिज वर्ल्डकप जिंकण्याचा प्रबळ दावेदार – पोलार्ड

Subscribe

किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात ३१ चेंडूत ८३ धावांची तुफानी खेळी करत किरॉन पोलार्डने मुंबई इंडियन्सला विजय मिळवून दिली. यंदाच्या आयपीएलमध्ये त्याच्यासोबतच आंद्रे रसेल, क्रिस गेल यांच्यासारख्या वेस्ट इंडियन खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे. तसेच वेस्ट इंडिजने संघाने मागील काही काळात चांगले प्रदर्शन केले आहे. मैदानाबाहेरही वेस्ट इंडिज क्रिकेटमध्ये बरेच बदल झाले आहेत.

क्रिकेट वेस्ट इंडिजला आता रिकी स्केरीट्ट यांच्या रूपात नवे अध्यक्ष मिळले आहेत. माजी अध्यक्ष डेव्ह कॅमरून यांच्यात आणि खेळाडूंमध्ये बरेच मतभेद होते. मात्र, स्केरीट्ट आणि खेळाडू यांच्यात संबंध चांगले आहेत. तसेच आता निवड समितीचेही नवे अध्यक्ष निवडण्यात आले आहेत. या बदलांमुळे एकंदरीतच वेस्ट इंडिज क्रिकेटला पुन्हा चांगले दिवस आले आहेत आणि त्यामुळे ते विश्वचषक जिंकण्याचे प्रबळ दावेदार आहेत, असे मत पंजाबविरुद्धच्या सामन्यानंतर पोलार्डने व्यक्त केले आहे.

- Advertisement -

आमचा संघ विश्वचषक जिंकण्याचा प्रबळ दावेदार आहे, असे आपण नक्कीच म्हणू शकतो. आमच्या निवड समितीचे नवे अध्यक्ष निवडण्यात आले आहेत, तसेच नव्या अध्यक्षांचीही निवड करण्यात आली आहे. मागील वर्षी आम्ही हा विश्वचषक जिंकू शकतो का असा प्रश्नही कोणी विचारत नव्हते. मात्र, आता तो विचारला जात आहे. आम्ही काय करू शकतो हे आम्हाला ठाऊक आहे. क्रिसने (गेल) या आयपीएलमध्ये खूप चांगली फलंदाजी केली आहे. आंद्रे रसेल अप्रतिम फटकेबाजी करत आहे. एक वेस्ट इंडियन म्हणून मला हे पाहून बरे वाटते. सुनील नरीनही चांगला खेळतो आहे. हे सगळे खेळाडू या स्पर्धेत चांगली कामगिरी करत आहेत, कारण त्यांना मैदानाबाहेर काय होत आहे, याबाबत विचार करावा लागत नाही, असे पोलार्ड म्हणाला.

पंजाबविरुद्धची खेळी तुझ्यासाठी खास होती का असे विचारले असता त्याने सांगितले, तुम्ही हवे तर तसे म्हणू शकता. माझ्यासाठी संघाला सामना जिंकवणे सर्वात महत्त्वाचे होते. मी दबाव असताना संयमाने खेळ करू शकलो आणि संघाला विजय मिळवून देऊ शकलो याचा आनंद आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -