घरक्रीडाचेंडूला तकाकी आणण्यासाठी थुंकीला पर्याय काय? - गंभीर

चेंडूला तकाकी आणण्यासाठी थुंकीला पर्याय काय? – गंभीर

Subscribe

क्रिकेटमध्ये चेंडूच्या एका बाजूची चमक राहावी यासाठी गोलंदाज बहुतांशवेळा थुंकी किंवा घामाचा वापर करतात. परंतु, करोनानंतर पुन्हा क्रिकेटला सुरुवात झाल्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) ही कृती करण्यावर बंदी घालण्याची शक्यता आहे. मात्र, यामुळे गोलंदाजांचे काम खूप अवघड होईल असे भारताचा सलामीवीर गौतम गंभीरला वाटते. तसेच बॅट आणि चेंडूमध्ये समतोल राहणार नाही व क्रिकेट हा फलंदाजांचा खेळ बनेल असेही त्याला वाटते.

चेंडूला तकाकी आणण्यासाठी थुंकीच्या वापरावर बंदी घातली तर गोलंदाजांचे काम फार अवघड होईल. त्यामुळे आयसीसीने याला पर्याय दिला पाहिजे. चेंडूला तकाकी आणल्याशिवाय बॅट आणि चेंडू यात टक्करच होऊ शकणार नाही. क्रिकेट हा फलंदाजांचा खेळ बनेल. थुंकीच्या वापरावर बंदी घातल्यास आयसीसीला काहीतरी पर्यायी व्यवस्था करावीच लागेल. अन्यथा गोलंदाजांना काहीच मदत नसेल आणि क्रिकेटमधील मजा निघून जाईल, असे गंभीर म्हणाला.

- Advertisement -

करोनामुळे मार्चच्या मध्यापासून सर्वप्रकारचे क्रिकेट बंद आहे. मात्र, आता हळूहळू पुन्हा क्रिकेट सुरु करण्याबाबत चर्चा होत आहे. परंतु, खेळाडूंना काही काळ क्रिकेटवर लक्ष केंद्रित करणे अवघड जाईल असे गंभीरला वाटते. काही खेळाडूंच्या मनात भीती असेल. ते खेळण्यासाठी मैदानात उतरतील, तेव्हा काहींच्या डोक्यात शंका असतील. त्यामुळे काही खेळाडूंना क्रिकेटवर लक्ष केंद्रित करणे काही काळ अवघड जाईल, असे गंभीरने सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -