Maharashtra Assembly Election 2024
घरक्रीडाJasprit Bumrah : बुमराहच्या गोलंदाजीवर आक्षेप! आयसीसीचे नियम काय सांगतात?

Jasprit Bumrah : बुमराहच्या गोलंदाजीवर आक्षेप! आयसीसीचे नियम काय सांगतात?

Subscribe

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या पाच सामन्याच्या कसोटी मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारताचा कर्णधार जयप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर आक्षेप घेण्यात आला होता. जयप्रीत बुमराह खरंच चुकीच्या पद्धतीने गोलंदाजी करत होता का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. जयप्रीत बुमराहच्या गोलंदाजीबाबत आयसीसीचे नियम काय सांगतात? याबाबत जाणून घेऊया...

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या पाच सामन्याच्या कसोटी मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारताचा कर्णधार जयप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर आक्षेप घेण्यात आला होता. जयप्रीत बुमराह खरंच चुकीच्या पद्धतीने गोलंदाजी करत होता का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. जयप्रीत बुमराहच्या गोलंदाजीबाबत आयसीसीचे नियम काय सांगतात? याबाबत जाणून घेऊया… (What do ICC rules say about Jasprit Bumrah bowling)

भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्याच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियात आहे. पर्थ येथे खेळवण्यात आलेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात भारताचा कर्णधार जसप्रीत बुमराहने घातक गोलंदीज करत 5 विकेट काढल्या. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर भारताने पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पुनरागमन केले होते. यानंतर भारताने पुनरागमन करत धावांचा डोंगर उभा केला. यानंतर तिसऱ्या दिवशीच भारताने पहिला सामना जिंकत मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. मात्र या सामन्यात जयप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर आक्षेप घेण्यात आला होता. ऑस्ट्रेलियन सोशल मीडियावर अकाऊंटवरून जसप्रती बुमराह चुकीच्या पद्धतीने गोलंदाजी करत असल्याचा आरोप करण्यात आला होता.

- Advertisement -

हेही वाचा – Kabaddi : नोकरीसाठी राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत बोगस खेळाडूंचा भरणा; चौकशीची मागणी

बुमराहच्या गोलंदाजीबाबत आयसीसीचे नियम काय सांगतात?

जसप्रीत बुमराहची आगळीवेगळी गोलंदाजी नेहमीच चर्चेचा विषय ठरते. चेंडू विचित्र पद्धतीने स्विंग केल्यानंतर तो वेगाने फलंदाजांकडे जाणे हा गुण जयप्रीत बुमराहकडे आहे. त्याची गोलंदाजी शैली आयसीसीच्या नियमांच्या कक्षेबाहेरची असू शकते, असे अनेकांचे मत आहे. पण, सत्य हे आहे की बुमराहची गोलंदाजी पूर्णपणे कायदेशीर आहे आणि नियमात बसते. कारण बुमराह गोलंदाजी करताना त्याचा कोपरा ज्या पद्धतीने वळवतो, त्यामुळे त्याला चेंडू वेगाने फेकायला मदत होते. विशेष म्हणजे त्याच्या कोपऱ्याचा कल आयसीसीने निश्चित केलेल्या 15 अंशांच्या मानकांपेक्षा कधीही ओलांडला नाही.

- Advertisement -

गोलंदाजी कधी बेकायदेशीर मानली जाते?

दरम्यान, जेव्हा एखादा खेळाडू चेंडू फेकतो किंवा आयसीसीने तयार केलेल्या नियमानुसार गोलंदाजी करत नाही, ते खेळाडूची गोलंदाजी बेकायदेशीर मानली जाते. आयसीसीच्या नियमानुसार, जेव्हा खेळाडूचा कोपरा चेंडू सोडण्यापूर्वी आणि हात आडव्या स्थितीपर्यंत पोहोचण्याच्या दरम्यान 15 अंशांपेक्षा जास्त वाकतो, तेव्हा ते बेकायदेशीर मानले जाते. पंच त्यांच्या अनुभवाच्या आधारे एखादा खेळाडूची गोलंदाजी अ‍ॅक्शन चुकीची असेल तर त्याला आधी इशारा देतात. मात्र इशारा दिल्यानंतरही खेळाडू गोलंदाजी चुकीच्या पद्धतीने करत असेल तर त्याला तत्काळ निलंबित केले जाते आणि सामना संपल्यानंतर पंच अहवाल सादर करतात. यानंतर, खेळाडूला आयसीसी मान्यताप्राप्त चाचणी केंद्रात पाठवले जाते, जिथे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आणि मानवी हालचालींच्या विज्ञानातील तज्ञांच्या देखरेखीखाली खेळाडूची चाचणी केली जाते. यानंतर खेळाडूला त्याची गोलंदाजी अ‍ॅक्शन सुधारेपर्यंत आणि पुन्हा चाचणी पास होईपर्यंत गोलंदाजी करण्यापासून निलंबित केले जाते.

हेही वाचा – PM Modi Death Threat : पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी; सहा वर्षात धमकीचा चौथा फोन


Edited By Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -