Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर क्रीडा IPL 2023 : काय आहे 'इम्पॅक्ट प्लेयर' नियम? यंदाच्या आयपीएलमध्ये मोठे बदल, जाणून घ्या

IPL 2023 : काय आहे ‘इम्पॅक्ट प्लेयर’ नियम? यंदाच्या आयपीएलमध्ये मोठे बदल, जाणून घ्या

Subscribe

आयपीएलच्या 16 व्या हंगामाला उद्यापासून सुरुवात होणार आहे. आयपीएल सुरू होण्यास काहीच तास शिल्लक राहिले आहेत. चेन्नई आणि गुजरात यांच्यामध्ये सलामीची लढत होणार आहे. मात्र, आयपीएल अधिक रंजक होण्यासाठी यंदा काही नवे नियम आणले आहेत. परंतु या स्पर्धेत एका नवीन नियमाची सर्वाधिक चर्चा होत आहे. तो म्हणजे ‘इम्पॅक्ट प्लेयर’ नियम. या नियमामुळे एका फटक्यात सामन्याचे फासे उलटवले जाऊ शकतात.

या नवीन नियमानुसार, नाणेफेकीच्या वेळी संघाला त्यांच्या प्लेइंग इलेव्हनसह 4 पर्यायी खेळाडूंची नावे द्यावी लागतील. त्या 4 खेळाडूंपैकी कोणत्याही एका खेळाडूचा कर्णधार सामन्यादरम्यान स्पेशल खेळाडू (इम्पॅक्ट प्लेअर) म्हणून वापर करू शकतो. रिटायर्ड हर्ट प्लेअरच्या जागी ‘इम्पॅक्ट प्लेअर’ही बॅटिंगला येऊ शकतो. दोन्ही संघ प्रत्येक सामन्यात इम्पॅक्ट खेळाडू वापरू शकतात. जर संघात 4 परदेशी खेळाडू खेळत असतील, तर विदेशी खेळाडूचा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून वापर करता येणार नाही.

- Advertisement -

भारतीय खेळाडूंना जास्तीत जास्त सामने खेळण्याची संधी मिळावी यासाठी असा नियम आणण्यात आला आहे. डावाच्या 20व्या षटकात कोणत्याही वेळी त्याचा वापर केला जाऊ शकतो. म्हणजेच पहिल्या ते 20व्या षटकापर्यंत कधीही त्याचा वापर करता येतो.

आयपीएल 2023चा कसा असेल फॉरमॅट?

- Advertisement -

आयपीएलच्या 10 संघांची 2 गटात विभागणी करण्यात आली आहे. गट निश्चित करण्यासाठी ड्रॉचा वापर केला गेला, ज्याने निर्धारित केले की दोन गटांपैकी कोणता संघ कोणत्या संघाविरुद्ध एकदा आणि कोणाविरुद्ध दोनदा खेळेल. गट टप्प्यात, प्रत्येक संघ त्याच्या गटातील इतर चार संघांशी दोनदा खेळेल. तर इतर गटातील चार संघ प्रत्येकी एकदा आणि उर्वरित संघ 2 सामन्यात खेळतील. अशा प्रकारे प्रत्येक संघ 14 सामने खेळणार आहे.


हेही वाचा : IPL 2023 : मुंबई इंडियन्सचा पहिला सामना कधी? जाणून घ्या संघाचे


 

- Advertisment -