‘शिव्यांशिवाय बोलतच नाही रोहित शर्मा’, जोडीदाराचा खुलासा

रोहित शर्मा शिव्यांशिवाय बोलतच नाही, असा खुलासा त्यांच्याच एका जोडीदाराने केली आहे.

rohit sharma
रोहित शर्मा

भारतीय क्रिकेट संघाचा खेडाळू रोहित शर्मा हा शिव्यांशिवाय बोलतच नाही, असा धक्कादायक खुलासा संघातल्याच त्याच्या एका जोडीदाराने केला आहे. रोहित शर्माविषयी हा खुलासा करणारा जोडीदार देखील सध्या रोहीत शर्मासोबत इंग्लंड दौऱ्यावर आहे आणि त्याच्यासोबत ड्रेसिंग रुम शेअर करतो. रोहितच्या त्या जोडीदाराचे म्हणणे आहे की, तो जेव्हाही त्याच्याशी बोलतो, त्यावेळी त्याच्या मुखातून शिव्याच बाहेर पडतात. त्याचबरोबर रोहित शर्माला विसरण्याचा आजार देखील असण्याचे त्याचे म्हणणे आहे. रोहित शर्माच्या सवयींबद्दल उघडपणे बोलणारा खेडाळू दुसरा तिसरा कुणी नसून दिनेश कार्तिक आहे. एका ‘चॅट शो’ दरम्यान दिनेश कार्तिकने मैदानाबाहेरच्या सगळ्या गमती जमती शेअर केल्या आहेत.

‘शिव्यांशिवाय विषयच नाही’

दिनेश कार्तिकने ‘ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन’ या ‘शो’च्या एका एपिसोडमध्ये रोहित शर्माशी संबंधित अनेक आश्चर्यचकीत खुलासे केले आहेत. भारतीय क्रिकेट संघ ज्या दिवशी इंग्लंडच्या दौऱ्यावर रवाना होणार होता, त्याच दिवशी या ‘शो’ची शूटींग करण्यात आली. कार्तिकने सांगितले की, ‘तो आणि रोहित शर्मा शिव्यांशिवाय बोलतच नाही. पूर्ण वेळ तो शिव्याच देत असतो. आजूबाजूच्या लोकांना विश्वासही बसणार नाही की, ते इतक्या शिव्या देतात’.

‘विसरभोळा आहे रोहित’

दरम्यान रोहित शर्मा हा विसरभोळा आहे. त्याला विसरण्याचा आजार आहे, असेही कार्तिकने सांगितले. कार्तिकने सांगितले की, ‘इंग्लंडच्या दौऱ्यावर रवाना होण्याअगोदर रोहित जेव्हा दिल्लीला आला तेव्हा त्याचा पासपोर्ट तो मुंबईलाच विसरला. त्याची एक बॅग तो मुंबईलाच विसरला. एका व्यक्तीला मुंबईवरुन दिल्लीला पासपोर्ट द्यायला यावे लागले होते’. या अगोदर ‘ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन’ शोमध्ये विरोट कोहलीसुद्धा रोहितच्या ‘विसरभोळ्या’ स्वभावाविषयी बोलला होता.