२०११ ची विश्वचषक स्पर्धा जिंकवून देणारे १३ खेळाडू सध्या काय करताहेत?

३० मे २०१९ पासून विश्वचषक स्पर्धा सुरु होत आहेत. या विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा देखील झाली आहे. याअगोदर २०११ साली विश्वचषक स्पर्धा भारताने जिंकली होती. मात्र, २०११ च्या भारतीय संघातील १५ खेळाडूंपैकी विराट कोहली आणि महेंद्र सिंह धोनी वगळता एकही खेळाडू आगामी विश्वचषकात खेळू शकणार नाहीत. त्यामुळे हे १३ खेळाडू गेले कुठे? हा प्रश्न उपस्थित होतो.

Where did the 13 players of indian cricket team who win the 2011 World Cup
२०११ ची विश्वचषक स्पर्धा जिंकवून देणारे १३ खेळाडू गेले कुठे?

भारतीय क्रिकेट संघाने २०११ साली झालेल्या विश्वचषक स्पर्धा जिंकली होती. भारतीय संघाने विश्वचषक जिंकून कित्येक वर्षांपासूनचे स्वप्न वास्तवात साकारले होते. दर चार वर्षांनी विश्वचषक स्पर्धा आयोजित केली जाते. २०११ नंतर २०१५ मध्ये देखील विश्वचषक स्पर्धा झाली. या स्पर्धेत भारतीय संघाला अपयश आले. त्यानंतर पुन्हा चार वर्षांनी लंडनमध्ये विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, २०११ साली विश्वचषकात खेळलेले दोनच खेळाडू यावर्षीच्या विश्वचषकात खेळणार आहे. त्यामुळे उरलेले खेळाडू गेले कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्व खेळाडूंचा तपशील आम्ही तुम्हाला देणार आहोत.

सचिन तेंडुलकर

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या खेळीत एक वेगळी जादू होती. सचिनने २०१३ साली सचिन निवृत्त जरी झाला असला तरी २०११ सालची विश्वचषक स्पर्धा ही त्याच्यासाठी शेवटची स्पर्धा होती. एकदिवसीय आणि मालिका सामन्यांमधील सचिनचा रेकॉर्ड आजही कोणी मोडू शकलेला नाही. त्यामुळेच सचिनला क्रिकेटचा देवता म्हटले जाते. सध्या सचिन आयपीएल स्पर्धेतील मुंबईच्या संघाला मार्गदर्शन देतो. याशिवाय त्याने नवोदित क्रिकेट खेळाडूंसाठी एक अॅकॅडमी सुरु केली आहे.

विरेंद्र सेहवाग

भारताचा आक्रमक खेळाडू विरेंद्र सेहवागचा मोठा चाहता वर्ग आहे. सेहवागची खेळण्याची पद्धत अत्यंत आक्रमक होती. तो भारतीय संघाचा सलामीवीर होता. त्याने ती परंपरा अखंड सुरु ठेवली. विरेंद्र सेहवाग देखील निवृत्त झाला. तो सध्या कॉमेंट्री टीमचा एक सदस्य आहे.

गौतम गंभीर

गौतम गंभीर हा देखील एक चांगला खेळाडू होता. परंतु, तो देखील निवृत्त झाला. त्यानंतर त्याने स्थानिक पातळीवर आपली चांगली कामगिरी बजावली. त्याने आयपीएलच्या स्पर्धेत कोलकाता संघाचे नेतृत्व करत दोन वेळा कोलकाताला विजय मिळवून दिला.

युवराज सिंग

युवराज सिंग हा २०११ च्या विश्वचषक स्पर्धेचा शिल्पकार होता. २०११ च्या विश्वचषक स्पर्धेत भारताला विजय मिळवून देण्यात त्याने महत्त्वाची कामगिरी बजावली. त्याने आतापर्यंत ४० कसोटी, ३०४ एकदिवसीय, ५८ ट्वेन्टी-२० सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. गेल्या काही वर्षांपासून त्याला कर्करोगाचे निदान झाले होते. त्यामुळे या लढवय्या युवराजने कर्करोगाशी प्रखर झुंज देऊन पुन्हा क्रिकेटमध्ये पर्दापण केले. परंतु, सध्याची त्याची कामगिरी पाहता त्याला यावर्षीच्या विश्वचषकात स्थान मिळालेले नाही.

एस. एस. श्रीशांत

एस. एस. श्रीशांत २०११ साली विश्वचषक स्पर्धेत खेळला होता. परंतु, २०१३ साली झालेल्या स्पॉट फिक्सिंगच्या प्रकरणावरुन श्रीशांतवर सुप्रीम कोर्टाने बंदी आणली होती. आता त्याचे वय ३६ झाले आहे.

आर अश्विन

रविचंद्रन अश्विनने देखील २०११ च्या विश्वचषक स्पर्धेत उत्कृष्ठ कामगिरी केली होती. मात्र, नंतरची त्याची कामगिरी पाहता विश्वचषकासाठी त्याची निवड झाली नाही. दरम्यान, अश्विनने आयपीएलमध्ये आपली कामगिरी सुरु ठेवली. २०१९ च्या आयपीएलच्या मोसमात अश्विन किंग्स इलेव्हन पंजाब या संघाचा कर्णधार होता.

हरभजन सिंग

हरभजन सिंगकडे चांगला अनुभव आहे. त्याने २०११ च्या विश्वचषक स्पर्धेत उत्कृष्ठ कामगिरी केली होती. तो एक उत्तम फिरकीपटू होता. परंतु, पुढे त्याची स्पर्धा आर अश्विन, कुलदीप यादव, चहल आणि जडेजा यांच्या सोबत झाली. शेवटी नियमांक मंडळाने हरभजन सिंगची कामगिरी पाहता त्याला २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेतून वगळले.

झहीर खान

झहीर खान मध्यम गती गोलंदाज होता. २०११ च्या विश्वचषक स्पर्धेत त्याची कामगिरी महत्त्वाची होती. परंतु, अखेर तो निवृत्त झाल्यामुळे २०१९ सालच्या विश्वचषकात खेळू शकत नाही.

आशिष नेहरा

आशिष नेहरा या गोलंदाजाला २०११ साली विश्वचषक खेळण्याची चांगली संधी मिळाली होती. परंतु, त्यानंतर त्याची कामगिरी फार काही यशस्वी दिसली नाही. त्यामुळे नियमांक मंडळाने त्याचे नाव वगळले.

सुरेश रैना, मुनाफ पटेल, पियूष चावला युसूफ पठान

सुरेश रैना, मुनाफ पटेल, पियूष चावला युसूफ पठान यांनी २०११ च्या विश्वचषक स्पर्धेत चांगली कामगिरी केली होती. परंतु, त्यानंतर त्यांना हवी तशी कामगिरी करता आली नाही. त्यामुळे नियमांक मंडळाने चौघांची नावे २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेतून वगळली आहेत.