IPL 2022 चे आयोजन UAE सोडल्यास कोणत्या देशात होणार?; BCCI चा ‘प्लॅन B’ तयार

देशात कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येऊ लागल्यानंतर बीसीसीआयने आयपीएलचे आयोजन भारतातच केले. मात्र अनेक खेळाडूंना कोरोना झाल्यामुळे स्पर्धा अर्धी झालेली असतानाच स्थगित करावी लागली. त्यानंतर आता जगभरात कोरोनाची तिसरी लाट आली आहे. त्यामुळे बीसीसीआय आयपीएलसाठी वेगवेगळ्या योजना आखत आहे.

Former cricketers and umpires' pensions to increase

मुंबई : सध्या सगळेच जण IPL चा नवा मोसम कधी सुरू होतोय, याची वाट पाहत आहेत. कोरोनानं जगभरात हाहाकार माजवला असून, त्याचे नवनवे स्ट्रेन सापडतायत. त्यामुळे अनेक देशांत कोरोनाची तिसरी लाट आली असून, ते पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या दिशेनं जात आहेत. कोरोनापायी अनेक क्रीडा स्पर्धाही रद्द करण्यात आल्यात. विशेष म्हणजे काही महिन्यांनी बीसीसीआयने यूएईत IPL 2022 स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्याचे आयोजन केले. आता आयपीएल (IPL 2022) च्या 15 व्या हंगामासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) आधीच प्लॅन बीवर काम सुरू केलंय.

देशात कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येऊ लागल्यानंतर बीसीसीआयने आयपीएलचे आयोजन भारतातच केले. मात्र अनेक खेळाडूंना कोरोना झाल्यामुळे स्पर्धा अर्ध्यावरच संपवावी लागली. त्यानंतर आता जगभरात कोरोनाची तिसरी लाट आलीय. त्यामुळे बीसीसीआय आयपीएलसाठी वेगवेगळ्या योजना आखत आहे. द इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, एप्रिलपर्यंत भारतातील कोरोनाची परिस्थिती सुधारली नाही तर बीसीसीआय पुन्हा एकदा परदेशात या स्पर्धेचे आयोजन करू शकते. पण तो परदेशी देश UAE नसेल. यावेळी बीसीसीआयच्या प्लॅन बीमध्ये ज्या दोन देशांची नावे पुढे येत आहेत, त्यापैकी एक दक्षिण आफ्रिका आणि दुसरा श्रीलंका आहे.

दक्षिण आफ्रिकेला 2009 मध्ये एकदाच बीसीसीआयची टी-20 लीग आयोजित करण्याचा अनुभव आहे. आता BCCI ने UAE व्यतिरिक्त ठिकाणाच्या इतर काही पर्यायांवर विचार सुरू केला आहे. बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की, “आम्ही एकट्या यूएईवर नेहमीच अवलंबून राहू शकत नाही. इतर पर्याय शोधावे लागतील. दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील वेळेतील फरक खेळाडू आणि क्रिकेट चाहत्यांनाही खूप अनुकूल असेल.

आयपीएल 2022 साठी बीसीसीआयच्या प्लॅन बी मध्ये दक्षिण आफ्रिकेचे नाव आघाडीवर आहे कारण अलीकडील उभय देशांमधील (भारत विरुद्ध द. आफ्रिका) मालिका तिथे यशस्वीरित्या संपली आहे. भारत अ संघाचा दौरा असो की वरिष्ठ संघादरम्यान खेळली जाणारी कसोटी मालिका. या दोन मालिकांच्या यशाने बीसीसीआयला यूएईऐवजी दक्षिण आफ्रिकेचा विचार करण्यास भाग पाडले आहे.


हेही वाचा : India Open 2022: आणखी 7 खेळाडूंना कोरोनाची लागण, स्पर्धेतून पडले बाहेर