घरक्रीडाकोणी उडवली हरभजन सिंगची झोप?

कोणी उडवली हरभजन सिंगची झोप?

Subscribe

भारताचा प्रसिद्ध बॉलर हरभजन सिंगदेखील फुटबॉलचा प्रचंड चाहता असून मेसीने सध्या आपली रात्रीची झोप घालवली असल्याचं ट्विट करून त्यानं सांगितलं आहे.

सध्या फीव्हर आहे तो फिफा वर्ल्ड कपचा. रूसमध्ये चालू असलेल्या फुटबॉल वर्ल्ड कपचा सर्वच चाहते आनंद घेत आहेत. भारतीय क्रिकेटपटूदेखील फुटबॉलचे चाहते असून आपली टीम त्यांनी निवडली असून त्या टीमला सपोर्ट देत आहेत. भारताचा प्रसिद्ध बॉलर हरभजन सिंगदेखील फुटबॉलचा प्रचंड चाहता असून मेसीने सध्या आपली रात्रीची झोप घालवली असल्याचं ट्विट करून त्यानं सांगितलं आहे.

मेसीसाठी उडणार हरभजनची झोप

‘येणारा पूर्ण महिना मी नक्कीच झोपू शकणार नाही…गो मेस्सी गो’ असं ट्विट हरभजननं करून आपण मेस्सीचा चाहता असल्याचं ट्विटमधून स्पष्ट केलं आहे. हरभजन मेसीला पाठिंबा दिला असून सध्या रोज हरभजन फुटबॉलच्या मॅच पाहण्यात व्यस्त आहे.

- Advertisement -

मेसी सर्वात आक्रमक फुटबॉलर

मेसी हा फुटबॉलमधील सर्वात आक्रमक बेस्ट ड्रिब्लिंग स्टाईलसाठी ओळखला जातो. २०१४ मध्ये मेसीच्या जादूमुळेच फायनलमध्ये अर्जेंटिना पोचलं होतं पण जर्मनीकडून त्यांना हार मानावी लागली. यावर्षीचा फिफा वर्ल्ड कप अर्जेंटिनानं जिंकावं यासाठी मेसीचा प्रयत्न नक्कीच असेल. ३१ वर्षीय मेसीचा हा कदाचित शेवटचा वर्ल्ड कप असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अर्जेंटिना हा संघ चांगला असला तरीही इतर खेळाडूंच्या तुलनेत मेसीनं अधिक गोल केले आहेत. त्यामुळं यावेळी अर्जेंटिनाला मेसी जिंकून देणार का? याकडे चाहत्यांचं लक्ष आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -