नवी दिल्ली : आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 स्पर्धेत भारतीय संघाने आतापर्यंत दमदार कामगिरी करत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. विशेष म्हणजे भारतीय संघाने आतापर्यंत खेळलेल्या सामन्यात डोळ्यांचे पारणे फेडणारे झेल पकडले आहेत. असे झेल पकडले आहेत, ज्यांची भारतीय चाहत्यांनी अपेक्षाच केली नसेल. परंतु मागील 2 ते 3 महिन्यांत असे काय घडले की, ज्यामुळे भारतीय संघ क्षेत्ररक्षणात सुपरमॅन बनला आहे. यामागे भारताचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप यांचा हात आहे. जे एकेकाळी शाळेत गणिताचे शिक्षण होते. (Who is the Great Guru who made the Indian team a superman in fielding Mathematics was once taught to children)
हेही वाचा – श्रीलंका संघाचं नशीबच फुटकं; ‘तो’ मैदानावर दोन मिनिटं उशिराने पोहचला अन् बाद झाला
एका मीडिया हाऊसला दिलेल्या मुलाखततीत टी दिलीप यांना विचारण्यात आले की, भारतीय संघात प्रशिक्षक होण्यासाठी पूर्वी तुम्ही किती क्रिकेट खेळलात? असा प्रश्न विचारला जात होता, पण आता सध्याचे प्रशिक्षक हा समज बदलत आहेत का? टी दिलीप यांनी सांगितले की, हैदराबादचा माजी डावखुरा फिरकीपटू आर श्रीधर हे भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या नेतृत्वाखालील कोचिंग स्टाफचा भाग होते आणि ते क्षेत्ररणासंदर्भात धारणा बदलणारे पहिले प्रशिक्षक होते. पण टी दिलीप यांचे म्हणणे आहे की, प्रशिक्षक म्हणून सन्मान मिळवण्यासाठी तुम्हाला मोठा स्टार बनण्याची गरज नाही किंवा तुम्हाला प्रथम श्रेणीचे खेळाडू असण्याचीही गरज नाही, कारण तुम्ही खेळाडूंकडून किती चांगली कामगिरी करून घेऊ शकता हे महत्त्वाचे असते.
ड्रेसिंग रुममधील आपल्या भाषणांनी सर्वांना मंत्रमुग्ध करणारे टी दिलीप हे राज्य क्रिकेट अकादमीच्या कनिष्ठ वयोगटातील कार्यक्रमाचे प्रशिक्षक म्हणून काम करायचे आणि आयपीएल संघ डेक्कन चार्जर्स संघासोबत (आता नॅशनल क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये एक दशक काम केले आहे.
हेही वाचा – विजयानंतर रोहित शर्माने नेमक्या शब्दांत दिले टीकाकारांना उत्तर; म्हणाला- लढण्यासाठी विराटची…
शाळेत मुलांना शिकवायचे गणित
दरम्यान, टी दिलीप यांचा क्षेत्ररक्षण प्रशिक्षक बनण्यापर्यंतचा प्रवास मनोरंजक आहे. त्याच्या कुटुंबाने त्याच्या क्रिकेट महत्त्वाकांक्षेला कधीही पाठिंबा दिला नाही. टी दिलीप यांच्या कुटुंबाने त्यांना शालेय मुलांना गणिताची शिकवणी देण्यास भाग पाडले होते. जेणेकरून ते प्रशिक्षणासाठी निधी उभारू शकतील. बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, ‘दिलीप हे खूप मेहनती प्रशिक्षक आहेत. त्यांनी बेसबॉल प्रशिक्षक माइक यंग यांचे सहाय्यक म्हणून काम केले जे डेक्कन चार्जर्सचे मुख्य क्षेत्ररक्षण प्रशिक्षक होते. त्यांनी लेव्हल 2 आणि 3 अभ्यासक्रमांमध्ये चांगले निकाल आणले. त्यांनी आर श्रीधर यांच्यासोबत ENCA मध्ये काम केले आहे.
सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाला पदक देण्याची परंपरा
विशेष म्हणजे भारतीय संघातील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाला पदक देण्याची परंपरा विकसित झाली आहे. हा पुरस्कार सोहळा भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये होतो आणि त्यावेळी मोठ्या थाटात घोषणाही होते. रोहित शर्माला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वोत्तम क्षेत्ररक्षणासाठी पदक देण्यात आला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात श्रेयस अय्यरच्या नावाची घोषणा सचिन तेंडुलकरने केली होती. याआधी विराट कोहली, रवींद्र जडेजा, शुभमन गिल हा पदक देण्यात आला आहे.