Virat Kohli Test Captaincy: विराट कोहलीनंतर कसोटी सामन्यात कर्णधारपदाची धुरा कोण सांभाळणार?, BCCIने दिली माहिती

virat kohli

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने कर्णधारपदावरून राजीनामा दिला आहे. त्यानंतर बीसीसीआयने आता नव्या कर्णधारपदी कोणत्या खेळाडूला संधी देणार ?, याबाबत विचार केला जात आहे. टीम इंडिया कसोटी सामना आता फेब्रुवारी महिन्यात खेळणार आहे. त्यामुळे बोर्ड सध्या घाईच्या भूमिकेत नाहीये.

पीटीआयने बीसीसीआयच्या दिलेल्या माहितीनुसार सांगितलं की, जर तिन्ही फॉरमॅटवरील सामन्यात एका खेळाडूला मान्यता दिली. तर कोणत्या खेळाडूचं नाव पुढे येईल. तीन्ही फॉरमॅटमध्ये रोहित शर्मा बेस्ट प्लेयर आहे आणि त्याचा अनुभव दांडगा आहे. आयपीएलमध्ये त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने पाच वेळा ट्रॉफी जिंकली आहे. रोहित शर्माच्या कर्णधार पदाची तुलना महेंद्रसिंग धोनीसोबत केलीय.

द्रविडचा पाठिंबा केएल राहुलला मिळू शकतो

केएल राहुलसाठी राहुल द्रविडचा मोठा पाठिंबा मिळू शकतो. तसेच सिनियर्सचा सुद्धा फायदा त्याला होऊ शकतो. तसेच फिटनेस आणि रोहित शर्मासारख्या खेळाडूला सर्व फॉरमॅटमध्ये मोठी संधी मिळण्याची शक्यता आहे.

टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये दांडगा अनुभव

बीबीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितलं की, भारतीय बोर्ड जो पर्यंत चागंल्या आणि अधिक काळ कर्णधार असलेल्या खेळाडूला निश्चित करत नाहीत. तोपर्यंत रोहित शर्माने कर्णधारपदाची धुरा सांभाळावी. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये एक सिनियर खेळाडू पाहीजे. ज्याअर्थी टीम इंडियाच्या कर्णधारपदाची धुरा तो सांभाळू शकेल.


हेही वाचा : Double Lung Transplant : उत्तर भारतात पहिल्यांदाच कोरोना रुग्णावर डबल लंग्स ट्रान्सप्लान्ट, शस्त्रक्रिया यशस्वी