घरक्रीडाथाला की मुंबईवाला ?

थाला की मुंबईवाला ?

Subscribe

आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोण कोरणार ?

आयपीएल म्हणजेच इंडियन प्रिमीयर लीग म्हणजे भारतातीलच नव्हे तर जगभरातील क्रीडा रसिकांसाठी एक उत्सवच असतो. 23 मार्चला सुरू झालेली ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यात येऊन पोहचली आहे. दिग्गज खेळाडू आणि त्यांचे पाठिराखे यांनी एकमेकांना नेटाने लढत दिल्यानंतर आयपीएलच्या अंतिम लढतीत मुंबई इंडियन्स-चेन्नई सुपरकिंग्ज हे दोन्ही संघ एकमेकांना भिडणार आहेत. दोन्ही संघांची कामगिरी पाहता दोन्ही संघांनी प्रत्येकी तीन वेळा विजेतेपद पटकावले आहे. दोन्ही संघाकडे जेतेपदाचा ’चौकार’ मारण्याची संधी आहे. धोनीला रोहितपेक्षा जास्त अनुभव असला तरी यंदाच्या अंतिम फेरीसाठी मात्र चेन्नईपेक्षा मुंबईचेच पारडे जड असल्याचे म्हटले जात आहे. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार तर चेन्नईपेक्षा मुंबईच भारी असल्याचे दिसत आहे. यंदाच्या हंगामामध्ये मुंबई आणि चेन्नई यांच्यांमध्ये तीन सामने खेळवण्यात आले. या तिन्ही सामन्यांमध्ये मुंबईलाच विजय मिळवता आला आहे. या तीन सामन्यांमध्ये चेन्नईला एकदाही मुंबईला पराभूत करता आलेले नाही. त्यामुळे यावेळी चेन्नई फॅन्समध्ये ‘थाला’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या धोनीच्या नेतृत्वाखालील संघ जिंकणार की रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स बाजी मारणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

रोहितचे पारडे जड

चेन्नईचा संघ आठव्यांदा आयपीएलच्या फायनलमध्ये पोहोचला आहे. तर मुंबई इंडियन्सने पाचव्यांदा फायनलमध्ये धडक दिली आहे. या दोघांमध्ये आतापर्यंत तीन अंतिम लढती झाल्या आहेत. विशेष म्हणजे मुंबईने दोन वेळा चेन्नईला पराभूत केले आहे. एकदा धोनीच्या संघाकडून मुंबईचा पराभव झाला आहे. कर्णधार म्हणून रोहित १०० टक्के यशस्वी ठरला आहे. २०१० मध्ये मुंबईचा फायनलमध्ये पराभव झाला होता, पण त्यावेळी सचिन तेंडुलकर कर्णधार होता. या मोसमात चेन्नई आणि मुंबई तीन वेळा आमनेसामने आले आहेत.

- Advertisement -

मुंबई इंडियन्सची शक्ती

फलंदाजी- मुंबईच्या संघात सलामीला येणारे रोहित शर्मा, डी कॉकने आतापर्यंत सुरेख खेळ केला आहे. तर मधल्या फळीतील सूर्यकुमार यादव, पोलार्ड, हार्दिक पंड्या आणि कृणाल यांच्यात प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर आक्रमण करण्यात माहिर आहेत. सर्वजण स्फोटक फलंदाजी करू शकतात.

गोलंदाजी- जसप्रीत बुमराह (१७ विकेट), लसिथ मलिंगा (१५ विकेट) आणि हार्दिक पंड्याने आतापर्यंत १४ विकेट घेतल्या आहेत. मलिंगाचे आव्हान प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांसमोर आहे. बुमराह सध्याचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज आहे. राहुल चहर (१२ विकेट) आणि कृणाल पंड्या (११ विकेट) यांनीही गरज असताना विकेट घेतल्या आहेत.

- Advertisement -

चेन्नई सुपर किंग्जची ताकद

फलंदाजी- संघात शेन वॉटसन, फाफ डू प्लेसिस, सुरेश रैना, अंबाती रायुडू, महेंद्रसिंग धोनीसारखे दिग्गज फलंदाज आहेत. ते अनुभवी असून, एकहाती विजय मिळवून देऊ शकतात. तळाला जडेजा आणि ब्राव्होसारखे आक्रमक फलंदाज आहेत.

गोलंदाजी- वेगवान गोलंदाज दीपक चहरच्या कामगिरीत सातत्य आहे. शार्दुल ठाकूर त्याला चांगली साथ देत आहे. चेन्नईचा फिरकी मारा चांगला आहे. हरभजन सिंग, इम्रान ताहिर जबरदस्त कामगिरी करत आहेत. ताहिरने या मोसमात आतापर्यंत २४ विकेट घेतल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -