घरक्रीडासंघात कोण खेळणार, कोण नाही हा माझा प्रश्न नाही !

संघात कोण खेळणार, कोण नाही हा माझा प्रश्न नाही !

Subscribe

भारताचे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांनी सध्या सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत चांगली कामगिरी केली आहे. शमीने याआधीच्या ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौर्‍यामध्येही चांगले प्रदर्शन केले होते. त्यामुळे मे महिन्यात सुरू होणार्‍या विश्वचषकाच्या दृष्टीने या दोघांनी भारताचे दोन प्रमुख वेगवान गोलंदाज म्हणून आपले संघातील स्थान निश्चित केले आहे, तसेच भारतीय संघात एक वेगवान गोलंदाजी करणारा अष्टपैलू आणि दोन फिरकीपटू असतात. त्यामुळे विशचषकामध्ये भुवनेश्वर कुमारला अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान मिळते का, हा प्रश्नच आहे. मागील विश्वचषकातही भुवनेश्वरला सामने खेळण्याची संधी मिळाली नव्हती. त्यामुळे आता संघामध्ये कोण खेळणार, कोण नाही हा माझा प्रश्न नाही आणि मी त्याबाबत विचारही करत नाही, असे भुवनेश्नर म्हणाला.

संघामध्ये कोण खेळणार, कोण नाही हा माझा प्रश्न नाही. माझ्यामते सर्व गोलंदाजांना विश्रांती मिळणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. बुमराहला न्यूझीलंडविरुद्ध विश्रांती देण्यात आली होती, तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या मालिकेत मला विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रत्येक खेळाडूला सातत्यपूर्ण कामगिरी करायची असते आणि त्यासाठी तुम्ही फिट असणे आवश्यक आहे. त्यामुळेच मी या मालिकेत विश्रांती घेतली, असे भुवनेश्वरने सांगितले.

- Advertisement -

तसेच काही दिवसांत सुरू होणार्‍या आयपीएलमुळे खेळाडूंना विश्वचषकाआधी विश्रांतीसाठी पुरेसा वेळ मिळेल का, असे विचारले असता भुवनेश्वर म्हणाला, विश्वचषक ही स्पर्धा प्रत्येक खेळाडूसाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे आयपीएलच्या दुसर्‍या सत्रात आम्ही फिटनेसकडे अधिक लक्ष देण्याचे ठरवले आहे. मात्र, आयपीएलदरम्यान जर आम्हाला थकवा जाणवला तर आम्ही नक्कीच विश्रांती घेऊ. यामध्ये संघमालक आणि व्यवस्थापनाचा निर्णयही महत्त्वाचा असेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -