घरक्रीडा'विश्वचषक जिंकायचा असेल तर, आधी भारताला पराभूत करा'

‘विश्वचषक जिंकायचा असेल तर, आधी भारताला पराभूत करा’

Subscribe

विश्वचषकात भारताने आतापर्यंत एकही सामना गमावला नाही.

विश्वचषक२०१९ मध्ये भारतीय संघाकडून उत्तम कामगिरी पाहायला मिळाली आहे. भारताने या विश्वचषकात ७ सामने खेळले असून यापैकी ६ सामन्यात विजय मिळवला आहे, तर १ सामना पाऊसामुळे रद्द करण्यात आला होता. या कामगिरीची सर्वत्र कौतुकास्पद चर्चा होत आहे. यासाठी इंग्लंड संघाचे माजी कर्णधार मायकल वार्नने इतर संघाला विश्वचषक जिंकण्याबाबत मोठा सल्ला दिला आहे.

- Advertisement -

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात ३० जून रोजी सामना होणार आहे. भारतीय संघाने या विश्वचषकात एकही सामना गमवला नाही.गुरुवारी वेस्ट इंडीजविरुद्धच्या सामन्यात भारताने तब्बल १२५ धावांनी विजय मिळवला आहे. भारताने दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिज यांना हरवून गुणतालिकेत ११ गुणांसह दुसरे स्थान मिळवले आहे.

भारतीय संघाची कामगिरी पाहून इंग्लंड संघाचे माजी कर्णधार यांनी इंग्लंडसह इतर संघाला सल्ला दिला आहे. ‘विश्वचषक जिंकायचा असेल तर भारतीय संघावर मात करावी लागेल’, असे मायकल वार्न म्हणाले. विश्वचषकात भारत हा सर्वात मजबूत संघ असल्याचे पाहायला मिळाले आहे. दरम्यान, भारतीय संघाने सलग ५ विजय मिळवले आहेत. विश्वचषकात एकही सामना न गमावलेला भारत एकमेव संघ आहे. भारतीय गोलंदाजीने चांगली भुमिका बजावत असल्याचे पाहायला मिळाले आहे. अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारतीय फलंदाजाना चांगली कामगिरी करता आली नाही. परंतु गोलंदाजीच्या जोरावर भारताने अफगाणिस्तानच्या संघावर ११ धावांनी विजय मिळवला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -