घरक्रीडाकरूण नायरला का नाही खेळवले?

करूण नायरला का नाही खेळवले?

Subscribe

भारताच्या इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्याला शुक्रवारपासून सुरुवात झाली. मालिका आधीच गमावली असल्याने भारताने या सामन्यात हनुमा विहारीला संधी दिली. पण करूण नायरला मात्र संधी मिळाली नाही. 

कसोटी सामन्यात वीरेंद्र सेहवागनंतर भारतासाठी त्रिशतक झळकावणारा करुण नायर हा एकमेव फलंदाज आहे. मात्र, असे असतानाही त्याला भारतीय संघात फार कमी वेळा संधी मिळाली आहे. करूणने त्याच्या कसोटी कारकिर्दीत ६ सामन्यांच्या ७ डावांत ६२ च्या सरासरीने ३७४ धावा केल्या आहेत. त्याचा इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय चमूत समावेश करण्यात आला होता. पण त्याला एकाही सामन्यात संधी मिळाली नाही. यामुळे भारताचे चाहते आणि खासकरून क्रिकेट समीक्षक फारसे खुश नाही. त्यांनी त्यांची नाराजी ट्विटरवर व्यक्त केली आहे.

संघाने काय सांगून करूणला वगळले हे जाणून घायला आवडेल – हर्षा भोगले

करुणला प्राधान्य दिले पाहिजे होते – आकाश चोप्रा 

- Advertisement -

पण संजय मांजरेकरचे थोडे वेगळे मत होते.

चांगले तंत्र असणाऱ्याला संघात घेणे आवश्यक – संजय मांजरेकर

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -