Gautam Gambhir in IPL: खासदार असतानाही गौतम गंभीर करतोय IPLमध्ये काम, जाणून घ्या काय आहे गुपित?

भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर (Gautam Gambhir) हा सर्वोत्तम भारतीय खेळाडूंपैकी एक खेळाडू आहे. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर गौतम गंभीर राजकारणाकडे वळला. गंभीर सध्या पूर्व दिल्लीतून भाजपचा खासदार (BJP MP) असला तरी तो क्रिकेट जगताशी निगडीत आहे. त्यामुळे गंभीरला एक सूत्रसंचालक म्हणून भविष्यात पाहिले जाऊ शकते. आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये लखनऊ सुपर जायंट्स या संघाला गौतम गंभीरने मार्गदर्शन केलं आहे. मात्र, के.एल. राहुलच्या नेतृत्वाखाली असलेला हा संघ अंतिम फेरीत धडक मारण्यास मुकला आहे.

गौतम गंभीर हा खासदार असून तो सूत्रसंचालन देखील करतो. तसेच आयपीएल संघांसोबत तो काम करतो, यावर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता गौतम गंभीर म्हणाला की, मी दर महिन्याला ५००० लोकांना जेवण देतो, ज्यामध्ये २५ लाख रुपये खर्च केले जातात आणि वर्षभरात पाहिले तर एकूण २ कोटी ७५ लाख रुपये खर्च केले जातात. मी एक वाचनालयही बांधले असून त्यावर २५ लाख रुपये खर्च केले आहेत.

गौतम गंभीर हा पूर्व दिल्ली मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचा खासदार आहे. या माजी भारतीय क्रिकेटपटू आणि खासदाराने गांधी नगरमध्ये सार्वजनिक स्वयंपाकघराची स्थापना केली आहे, जिथे सर्व लोकांना एक रुपयात जेवण दिले जाते. एवढेच नाही तर त्याने या भागात वाचनालयही स्थापन केले आहे. यावेळी, गौतम गंभीर आयपीएलमधील यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे, ज्याने त्याच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाइट रायडर्सला दोनदा विजेतेपद मिळवून दिले आहे.

लखनौच्या कामगिरीचे श्रेय गंभीरला

आयपीएलमध्ये पहिल्यांदाच खेळणाऱ्या लखनौ सुपर जायंट्सने अप्रतिम कामगिरी केली. या संघाने गुणतालिकेत तिसरे स्थान पटकावले आणि प्लेऑफमध्येही पोहोचले. मात्र, हा संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध हरला. संघाच्या कामगिरीचे श्रेय मोठ्या प्रमाणावर गौतम गंभीरला दिले जात आहे.


हेही वाचा : दिवंगत शेन वार्नच्या ‘बॉल ऑफ द सेंच्युरी’ला २९ वर्ष पूर्ण