Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर क्रीडा Playoff सामन्यांपूर्वी गुजरात टायटन्सची जर्सी बदलली; काय आहे कारण?

Playoff सामन्यांपूर्वी गुजरात टायटन्सची जर्सी बदलली; काय आहे कारण?

Subscribe

नवी दिल्ली : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज (15 मे) गुजरात टायटन्स आणि सनरायर्झस हैदराबाद  यांच्याचत सामना होत आहे. या सामन्याच्या नाणेफेकीवेळी गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या नाणेफेकी वेळी मैदानावर आला आणि सर्वांनाच धक्का बसला. कारण गुजरात टायटन्सचा जर्सीचा रंग बदलला असा प्रश्न सर्वांना पडला होता.

आयपीएल 2023 च्या 16 व्या हंगामात गुजरात टायटन्स आणि सनरायर्झस हैदराबाद यांच्यात 62 वा सामना होत आहे. या सामन्याच्या नाणेफेकीवेळी हार्दिक पांड्या आला तेव्हा त्याने लॅव्हेंडर रंगाची जर्सी घातली होती. अशा रंगाची जर्सी आयपीएलच्या एकाही हंगामात पाहायला मिळाली नव्हती. त्यामुळे या रंगाची जर्सी का घातली याचा विचार मैदानावर उपस्थित असलेल्या आणि टिव्हीवर पाहणाऱ्या प्रेक्षकांना पडला होता. पण काही वेळातच लॅव्हेंडर रंगाची जर्सी का घातली हे समाेर आले.

- Advertisement -

गुजरातने कर्करोगाबाबत जनजागृती करण्यासाठी फक्त एका सामन्यासाठी लॅव्हेंडर रंगाची जर्सी घालण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरात संघाने एका चांगल्या गोष्टीची जनजागृती करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. यापूर्वी रॉयल चॅलेंजर बंगळुरू संघाने ग्लोबल वॉर्मिंगमुळे पृथ्वीला होणाऱ्या नुकसानाविरोधात हिरव्या रंगाची जर्सी घातली आहे आणि प्रत्येक हंगामात ते एका सामन्यासाठी जर्सी परिधान करताना दिसतात.

दरम्यान, आयपीएल 2023 बद्दल बोलायचे झाले तर, गुजरातने चांगल्या कामगिरीसह गुणतालिकेच अव्वल स्थान गाठले आहे. त्यांना प्लेऑफमध्ये जाण्यासाठी फक्त एका विजयाची गरज आहे. गुजरातने आतापर्यंत 12 सामने खेळताना 8 विजय मिळवले आहेत, तर त्यांना 4 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे गुजरातचा +0761 एवढा चांगला रनरेट आहे. सनरायर्झस हैदराबादबद्दल बोलायचे झाले तर त्यांच्या प्लेऑफमध्ये पोहचण्याच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत. कारण हैदराबादने आतापर्यंत खेळलेल्या 11 सामन्यात 4 विजय मिळवले आहेत तर, 7 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे हैदराबाद 8 गुणांसह नवव्या स्थानावर आहे. त्यामुळे हैदराबादला प्लेऑफमध्ये जाण्यासाठी पुढील तीन सामने चांगल्या रनरेटसह जिंकावे लागणार आहेत. याशिवाय त्यांना इतर संघाच्या पराभवावर अवलंबुन राहावे लागणार आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -