Wednesday, August 4, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर क्रीडा WI vs AUS : क्रिस गेलचे झंझावाती अर्धशतक; विंडीजची टी-२० मालिकेत बाजी

WI vs AUS : क्रिस गेलचे झंझावाती अर्धशतक; विंडीजची टी-२० मालिकेत बाजी

गेलने ६७ धावांच्या खेळीत ७ षटकार मारले.

Related Story

- Advertisement -

क्रिस गेलने केलेल्या झंझावाती अर्धशतकाच्या जोरावर वेस्ट इंडिजने तिसऱ्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ६ विकेट आणि ३१ चेंडू राखून पराभव केला. या विजयासह विंडीजने पाच सामन्यांच्या या टी-२० मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी मिळवली आहे. सेंट लुसिया येथे झालेला हा सामना जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाने विंडीजपुढे १४२ धावांचे आव्हान ठेवले होते. याचा पाठलाग करताना गेलने ३८ चेंडूत ४ चौकार आणि ७ षटकारांची आतिषबाजी करत ६७ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे विंडीजने १४२ धावांचे लक्ष्य १४.५ षटकांत गाठत हा सामना जिंकला.

हेडन वॉल्शच्या दोन विकेट 

या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली होती. ऑस्ट्रेलियाच्या डावाची चांगली सुरुवात झाली. मॅथ्यू वेडने १६ चेंडूत २३ धावा केल्यावर त्याला ओबेड मकॉयने बाद केले. मागील दोन सामन्यांत अर्धशतक करणारा मिचेल मार्श केवळ ९ धावा करून माघारी परतला. तर लेगस्पिनर हेडन वॉल्शने फिंच (३०) आणि अ‍ॅलेक्स कॅरी (१३) यांना झटपट बाद केले. यानंतर मोईसेस हेन्रिक्स (३३) आणि अ‍ॅश्टन टर्नर (२४) यांनी काही चांगले फटके मारले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने २० षटकांत ६ बाद १४१ अशी धावसंख्या उभारली.

गेलचे कारकिर्दीतील १४ वे अर्धशतक 

- Advertisement -

१४२ धावांचा पाठलाग करताना विंडीजचे सलामीवीर आंद्रे फ्लेचर (४) आणि लेंडल सिमन्स (१५) फारशा धावा करू शकले नाही. परंतु, गेलने ऑस्ट्रेलियाने गोलंदाजांवर हल्ला चढवला. त्याने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील १४ वे अर्धशतक ३३  चेंडूत पूर्ण केले. अखेर गेल ३८ चेंडूत ६७ धावा करून बाद झाला. परंतु, निकोलस पूरनने संयमाने फलंदाजी सुरु ठेवत (नाबाद ३२) विंडीजला ३१ चेंडू शिल्लक असतानाच विजय मिळवून दिला.

- Advertisement -