घरक्रीडाWI vs ENG: ब्रॅथवेटची इंग्लंडविरुद्ध 12 तास फलंदाजी, 160 धावांच्या खेळीत खास...

WI vs ENG: ब्रॅथवेटची इंग्लंडविरुद्ध 12 तास फलंदाजी, 160 धावांच्या खेळीत खास कामगिरी

Subscribe

ब्रॅथवेटने आपल्या कर्णधारपदाच्या खेळीने सर्वांना प्रभावित केले. त्याने प्रदीर्घ फलंदाजी करत चौथ्या दिवशी सामना वाचवला. 29 वर्षीय फलंदाजाने सुमारे 12 तास फलंदाजी केली, यादरम्यान त्याने 489 चेंडूंचा सामना केला. कॅरेबियन कर्णधाराने आपल्या धडाकेबाज खेळीने एक खास विक्रम केला.

नवी दिल्लीः वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना अनिर्णित राहण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. बार्बाडोसच्या केनिंग्स्टन ओव्हलवर सुरू असलेल्या सामन्यात कॅरेबियन कर्णधार क्रेग ब्रॅथवेटच्या मॅरेथॉन इनिंगने इंग्लंडची मेहनत आणि आकांक्षा पुरत्या धुळीस मिळवल्या आहेत. सामन्याच्या चौथ्या दिवशी जबरदस्त फलंदाजी करताना ब्रॅथवेटने ऐतिहासिक खेळी केली. त्याने 489 चेंडूत 160 धावा केल्या. त्याच्या खेळीमुळे यजमान वेस्ट इंडिजने पहिल्या डावात इंग्लंडच्या 507 धावांना प्रत्युत्तर देताना 411 धावा उभारल्यात.

ब्रॅथवेटने आपल्या कर्णधारपदाच्या खेळीने सर्वांना प्रभावित केले. त्याने प्रदीर्घ फलंदाजी करत चौथ्या दिवशी सामना वाचवला. 29 वर्षीय फलंदाजाने सुमारे 12 तास फलंदाजी केली, यादरम्यान त्याने 489 चेंडूंचा सामना केला. कॅरेबियन कर्णधाराने आपल्या धडाकेबाज खेळीने एक खास विक्रम केला. ब्रायन लारानंतर एका डावात सर्वाधिक चेंडू खेळण्याचा विक्रम आता ब्रॅथवेटच्या नावावर आहे. या प्रकरणात त्याने कार्ल हूपर, ख्रिस गेल आणि जिमी अॅडम्सला मागे टाकले.

- Advertisement -


ब्रॅथवेटशिवाय ब्लॅकवुड आणि यष्टिरक्षक फलंदाज जोशुआ डी सिल्वा यांनीही संघर्षपूर्ण खेळी केली. ब्लॅकवुडने 215 चेंडूत 102 तर जोशुआने 112 चेंडूत 33 धावा केल्यात. इंग्लंडकडून जॅक लीचने तीन तर साकिब महमूद आणि बेन स्टोक्सने प्रत्येकी दोन गडी बाद केले. दुसऱ्या डावात फलंदाजी करताना इंग्लंडने एकही विकेट न गमावता 40 धावा केल्या आणि त्यांची आघाडी 136 धावांपर्यंत वाढली. इंग्लंडकडून अॅलेक्स लीस (18) आणि जॅक क्रोली (21) नाबाद आहेत.


हेही वाचाः दिल्ली कॅपिटल्सवरचं संकट दूर, बलाढ्य खेळाडू परतल्याने दिलासा

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -