घरक्रीडाWI Vs SL: खेळाडूच्या चेहऱ्यावर आदळला चेंडू, वेस्ट इंडिज विरुद्ध श्रीलंकेच्या कसोटीदरम्यान...

WI Vs SL: खेळाडूच्या चेहऱ्यावर आदळला चेंडू, वेस्ट इंडिज विरुद्ध श्रीलंकेच्या कसोटीदरम्यान गंभीर दुखापत

Subscribe

वेस्ट इंडिजचा क्रिकेट संघ कसोटी सामन्यासाठी श्रीलंका दौऱ्यावर आहे. श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडिजमध्ये पहिला कसोटी सामना खेळवण्यात येत असताना खेळाडूच्या चेहऱ्यावर चेंडू आदळल्यामुळे गंभीर दुखापत झाली आहे. मैदानात वेस्ट इंडिजच्या खेळाडूच्या हेल्मेटवर फॉरवर्ड शॉर्ट लेगवर क्षेत्ररक्षण करताना जोरात चेंडू लागला. हा चेंड एवढा जोरात आदळला की खेळाडू जागीच कोसळून पडला. तात्काळ डॉक्टरांची टीम खेळाडू जवळ पोहोचली मात्र खेळाडूला गंभीर दुखापत झाली असल्यामुळे त्याला स्ट्रेचरवरुन थेट रुग्णालयात नेण्यात आले.

वेस्ट इंडिजचा खेळाडू जेरेमी सोलोजानो असा या २६ वर्षीय खेळाडूचे नाव आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध श्रीलंकेच्या कसोटी सामन्यात जेरेमीने पदार्पण केलं होते. मात्र पहिल्याच सामन्यात जेरेमीला गंभीर दुखापत झाली आहे. कसोटी सामन्यात २४ व्या षटकादरम्यान घटना घडली आहे. या षटकामध्ये रोस्टन चेजने चौथ्या चेंडूवर श्रीलंकेचा कर्णधार दिमुथ करुणारत्ने याने लेग साइडला जोरात चेंडू टोलवला. हा चेंडू शॉर्ट लेगवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या जेरेमीच्या हेलमेटच्या जाळीवर जोरात आदळतो. जेरेमी लगेच आपले हेलमेट काढतो आणि कोसळतो. करुणारत्नेने हा चेंडू एवढ्या ताकदीने टोलवला होता की, चेंडू हेलमेटवर आदळताच त्याचा पाठीमागचा भाग निघाला होता.

- Advertisement -

जेरेमीला तात्काळी वैद्यकीय मदत देण्यात आली होती. त्याला स्ट्रेचरवरुन मैदानातून बाहेर नेण्यात आले आणि नंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात विविध चाचण्या केल्यानंतर त्याची दुखापत किती गंभीर आहे हे समजणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा : यूएईनंतर IPL 2022चा थरार कुठे रंगणार?, बीसीसीआय सचिव जय शाह यांची मोठी घोषणा


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -