घरक्रीडाIPL 2021PHASE 2: अर्जुन तेंडुलकर करणार मुंबई इंडियन्स कडून पदार्पण?

IPL 2021PHASE 2: अर्जुन तेंडुलकर करणार मुंबई इंडियन्स कडून पदार्पण?

Subscribe

आयपीएल(IPL)-२०२१ च्या दुसऱ्या हंगामात मुंबई इंडियन्सकडून अर्जुन तेंडुलकर करु शकतो पदार्पण

महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सध्या सोशल मीडिया त्याचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतोय, ज्यात तो जोरदार सराव करताना दिसत आहे. आयपीएल २०२१ मध्ये अर्जुन तेंडुलकरला मुंबई इंडियन्सने आपल्या ताफ्यात घेतले. आयपीएलच्या या दुसऱ्या सत्रात तो मुंबई इंडियन्स कडून मैदानावर खेळताना दिसण्याची शक्यता आहे.

सराव करताना दिसला अर्जुन तेंडुलकर

दुबईत मुंबई इंडियन्स संघाकडून अर्जुन तेंडुलकर आयपीएल २०२१च्या दुसऱ्या सत्रासाठी सराव करताना दिसला. तो साऊथ आफ्रिकेचा २१ वर्षांचा सहा फूट आठ इंच उंची असलेल्या मार्को जेनसनसोबत वेगवान गोलंदाजी तसेच प्रमुख अस्त्र यॉरकर चेंडू फेकताना दिसला. साऊथ आफ्रिकेच्या मार्को जेनसन पेक्षाही वेगवान गोलंदाजी करताना अर्जुन दिसला.

- Advertisement -

आयपीएलच्या लिलावात अर्जुन तेंडुलकरला मुंबई इंडियन्सने २० लाख किमतीवर खरेदी केले. आयपीएलच्या पहिल्या हंगामात त्याला संधी मिळाली नाही, पण जबरदस्त कामगिरी करताना तो सध्या दिसत आहे, यावेळी तो आयपीएलमध्ये पदार्पण करताना दिसणार अशी चर्चा सर्वत्र आहे.

- Advertisement -

आयपीएल २०२१ च्या पहिल्या हंगामात मुंबई इंडियन्सची कामगिरी – मुंबई इंडियन्सने ७ सामने खेळले असून, त्यापैकी त्यांनी ४ सामने जिंकले आहेत, तर ३ पराभूत झाले आहेत. तर ८ गुणांसह मुंबई गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे.


हेही वाचा : ind vs eng 4th test 2021 : भारतीय संघाची जेष्ठ क्रिकेट प्रशिक्षक वासुदेव परांजपेंना श्रद्धांजली


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -