Wednesday, September 22, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा भारत सलग १० वी सिरीज जिंकणार का?

भारत सलग १० वी सिरीज जिंकणार का?

भारत सलग १० वी सिरीज जिंकण्यासाठी प्रयत्न करणार असून सर्व क्रिकेट चाहत्यांचं लक्ष आजच्या मॅचवर खिळलेलं आहे. मात्र ही मॅच दोन्ही संघासाठी चुरशीची असेल.

Related Story

- Advertisement -

रविवारी फीफा वर्ल्ड कप असल्याचं लक्षात घेऊन भारत विरुद्ध इंग्लंडमधील दुसरी वनडे मॅच शनिवारी खेळवण्यात येणार आहे. पहिली मॅच आठ विकेट्सनं हरल्यानंतर भारताचा आत्मविश्वास दुणावला असेल तर इंग्लंडसाठी जिंकणं सोपं नसेल. भारत सलग १० वी सिरीज जिंकण्यासाठी प्रयत्न करणार असून सर्व क्रिकेट चाहत्यांचं लक्ष आजच्या मॅचवर खिळलेलं आहे. मात्र ही मॅच दोन्ही संघासाठी चुरशीची असेल. कुलदीप यादव या मॅचमध्येदेखील आपल्या फिरकीची जादू चालवणार का? याकडेदेखील चाहत्यांचं लक्ष असेल.

सरावासाठी मिळाला कमी वेळ

दोन्ही मॅचमध्ये केवळ दोन दिवसांचा फरक असल्यामुळं सरावासाठी खेळाडूंना कमी वेळ मिळणार. त्यामुळं व्हिडिओ पाहून विश्लेषण करायलादेखील दोन्ही टीमकडे कमी वेळ आहे. त्यामुळं कुलदीपसमोर खेळण्यासाठी इंग्लंडच्या खेळाडूंना जास्त मानसिक तयारी करावी लागण्याची शक्यता आहे.

जोस बटलर येणार तिसऱ्या क्रमांकावर

- Advertisement -

जो रूट सध्या चांगल्या फॉर्ममध्ये नाही. तिन्ही मॅचमध्ये सलग स्पिनरकडून जो रूट आऊट झाला आहे. त्यामुळं जोस बटलर तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगला येण्याची शक्यता आहे. सहाव्या क्रमांकावर येऊनदेखील त्यानं अर्धशतक केल्यामुळं आणि स्पिनर्सचा सामना योग्य तऱ्हेनं केल्यामुळं त्याला तिसऱ्या क्रमांकावर पाठवलं जाऊ शकतं. मॉर्गननंदेखील बटलर तिसऱ्या क्रमांकावर येण्याचे संकेत दिले आहेत.

भारतानं २०१६ नंतर बायलॅट्रल सिरीज गमावली नाही

भारतानं जानेवारी २०१६ मध्ये केलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर एकही द्विपक्षीय अर्थात बायलॅट्रल वनडे सिरीज गमावलेली नाही. त्यानंतर लागोपाठ ९ सिरीज भारतानं जिंकल्या असून यामध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी एकमात्र अशी टूर्नामेंट आहे, जो भारताला मिळाला नाही. या मॅचमध्ये भारत जिंकल्यास, आयसीसी रँकिंगमध्ये इंग्लंड आणि भारतातील पाँईंट्सचे अंतर कमी होईल. तर, भारताची जिंकण्याची ही सलग १० वी सिरीज ठरेल.

- Advertisement -