घरक्रीडात्या वर्ल्डकपमध्ये विल्यमसनने केलेले प्रभावित - विराट कोहली

त्या वर्ल्डकपमध्ये विल्यमसनने केलेले प्रभावित – विराट कोहली

Subscribe

न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने २००८ सालच्या १९ वर्षांखालील विश्वचषकात मला खूप प्रभावित केले होते, असे विधान भारताचा कर्णधार विराट कोहलीने केले. कोहलीच्या भारतीय संघाने हा विश्वचषक जिंकला होता. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताने विल्यमसनसह ट्रेंट बोल्ट, टीम साऊथी, कोरी अँडरसन यांसारख्या खेळाडूंचा समावेश असलेल्या न्यूझीलंडवर मात केली होती.

विल्यमसनविरुद्धचा सामना मला आजही आठवतो. त्याने मला खूप प्रभावित केले होते. तो संघातील इतर खेळाडूंपेक्षा वेगळा होता. त्याच्यात खूप प्रतिभा असल्याचे तेव्हाच दिसले होते. त्या विश्वचषकात खेळलेल्या विल्यमसन, स्टिव्ह स्मिथसारख्या खेळाडूंनी पुढे जाऊन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपापल्या देशांचे प्रतिनिधित्व केले याचा मला आनंद आहे. १९ वर्षांखालील विश्वचषक ही माझ्या कारकिर्दीत फार महत्त्वाची स्पर्धा होती. या स्पर्धेमुळे मला माझ्यातील प्रतिभा दाखवण्याची आणि स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळाली, असे कोहली म्हणाला. कोहलीने या स्पर्धेत ४७ च्या सरासरीने २३५ धावा केल्या होत्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -