घरक्रीडाविम्बल्डन स्पर्धेच्या महिला गटात एलेना रिबाकिना विजयी

विम्बल्डन स्पर्धेच्या महिला गटात एलेना रिबाकिना विजयी

Subscribe

टेनिस (Tennis) खेळात मानाची स्पर्धा असलेल्या विम्बल्डन टूर्नांमेंटमध्ये कझाकिस्तानच्या एलेना रिबाकिनाने (Elena Rybakina) विजय मिळवला आहे. विम्बल्डन टूर्नांमेंटच्या महिला गटात ट्युनिशियाच्या ओन्स जेबुरचा (Ons Jabeur) पराभव केला.

टेनिस (Tennis) खेळात मानाची स्पर्धा असलेल्या विम्बल्डन टूर्नांमेंटमध्ये कझाकिस्तानच्या एलेना रिबाकिनाने (Elena Rybakina) विजय मिळवला आहे. विम्बल्डन टूर्नांमेंटच्या महिला गटात ट्युनिशियाच्या ओन्स जेबुरचा (Ons Jabeur) पराभव केला. (Wimbledon 2022 women’s final Elena rybakina beat ons jabeur)

एलेना रिबाकिनाच्या विजयामुळे प्रथमच कझाकिस्तानच्या (Kazakhstan) खेळाडूने जिंकला खिताब जिंकला आहे. विशेष म्हणजे २३ वर्षीय एलिना २०११ पासून विम्बल्डन (Wimbledon 2022 Final) जिंकणारी सर्वात तरुण महिला ठरली आहे.

- Advertisement -

एलिना रिबाकिनाने (Elena Rybakina) विम्बल्डन टूर्नांमेंटच्या अंतिम फेरीत (Final) जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ओन्स जबेउरचा पराभव केला. दोन तासांपेक्षा जास्त काळ रंगलेल्या या लढतीत रायबाकिनाने ३-६, ६-२, ६-२ असा विजय मिळवला.

या अत्यंत मोठ्या विजयानंतर एलेनाचा आनंद गगणात मावेनासा झाला होता. विजयानंतर एलेनाने प्रसारमाध्यमांशी बातचीत केली, यावेळी ती म्हणाली की, “मी सध्या नि:शब्द आहे. मी यावेळी प्रतिस्पर्धी ओन्सचे अभिनंदन करू इच्छिते. ती इतर खेळाडूंसाठी एक प्रेरणा आहे. तिच्याविरुद्ध खेळणे खूप अविश्वसनीय आणि आनंदी होते. यावेळी प्रेक्षकांची गर्दीही अद्भुत होती. मी हा खिताब पटकावेल अशी अपेक्षा नव्हती पण या विजयानंतर मी सर्वांचे आभार मानू इच्छिते”, असे म्हटले.

- Advertisement -

हेही वाचा – ‘राज्याची प्रगती व्हावी, सर्वांगीण विकास व्हावा’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे विठ्ठलाला साकडं

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -