Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा विम्बल्डन Men’s Semi Final: जोकोविच की नदाल? चुरशीला सुरुवात

विम्बल्डन Men’s Semi Final: जोकोविच की नदाल? चुरशीला सुरुवात

राफेल नदाल आणि नोवाक जोकोविच यांच्यात शुक्रवारी 'विम्बल्डन मेन्स सेमी फायनल'ची दुसरी मॅच झाली. मात्र कर्फ्युटाईममुळे ही मॅच शनिवारी पहाटे थांबवण्यात आली. शनिवारी संध्याकाळी ५:३० वाजता मॅच पुन्हा सुरु होईल

Related Story

- Advertisement -

राफेल नदाल आणि नोवाक जोकोविच यांच्यात विम्बल्डन ग्रँडस्लॅमच्या उपांत्य फेरीची दुसरी मॅच सुरु आहे. सामन्यातील ३ सेट पूर्ण झाले असून नोवाक जोकोविच हा ६-४, ३-६, ७-६ च्या सेटने आघाडीवर आहे. शनिवारी पहाटे कर्फ्यु टाईममुळे ही मॅच ३:३० वाजता थांबवण्यात आली. दरम्यान शनिवारी (आज) संध्याकाळी ५:३० वाजता पुन्हा ही मॅच पुढे सुरु होईल. या मॅचमध्ये जो खेळाडू जिंकेल तो थेट फायनल्समध्ये केविन अँडरसनसोबत भिडेल. जगभरातील टेनिस प्रेमींचे आणि नदाला फॅन्सचे या मॅचकडे लक्ष लागून राहिले आहे. नदाल आणि जोकोविच यांच्यामध्ये आज होणारी ही सेमी फायनलची चुरशीची ठरणार आहे.

जोकेविचने मारली बाजी

राफेल नदाल आणि नोवाक जोकोविच यांच्यामधील सेमी फायनलची दुसरी मॅच शुक्रवारी रात्री ११ वाजता सुरु झाली. या मॅचमध्ये एकूण तीन सेट खेळले गेले. ज्यामध्ये नदाल एक सेट खेळला आणि जोकोविच दोन सेट. नादाल या मॅचमध्ये आघाडीवर राहणार अशी शक्यता वर्तवली जात असताना, खेळात बाजी मारली ती जोकोविचने. ज्यावेळी कर्फ्यु टाईममुळे मॅच थांबवण्यात आली त्यावेळेचा स्कोअर ६-४, ३-६, ७-६ असा होता. आता शनिवारी संध्याकाळी या मॅचचा उर्वरित टप्पा पार पडणार असून, शेवटच्या २ सेटमध्ये कोण धडक मारणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. सद्य स्थितीत उर्वरित दोन सेट्सपैकी एक सेट जरी जोकोविच जिंकला तर तो थेट फायनल्समध्ये पोहोचेल. जिथे त्याची लढत केविन अँडरसनशी असेल.

अँडरसनची फायनल्समध्ये धडक

- Advertisement -

केविन अँडरसनने याआधीच इस्नरसोबतची मॅच जिंकत फायनल्समध्ये धडक मारली आहे.  शुक्रवारी संध्याकाळी ५:३० वाजता जॉन इस्नर आणि केविन अँडरसन यांच्यामध्ये मेन्स सेमी फायनलची पहिली मॅच रंगली होती. या दोघांमध्ये रंगलेली मॅच विम्बल्डनच्या इतिहासातील दुसऱ्या नंबरवरची सर्वाधिक वेळ चालणारी मॅच ठरली. एकूण साडेसहा तास ही मॅच रंगली होती. यामध्ये अँडरसनने इस्नरवर विजय मिळवत थेट फायनल्समध्ये धडक मारली.

- Advertisement -