घरक्रीडाटी-२० संघातून होपला वगळले!

टी-२० संघातून होपला वगळले!

Subscribe

 भारताविरुद्धच्या मालिकेसाठी विंडीज संघ जाहीर

भारताविरुद्धच्या आगामी टी-२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी वेस्ट इंडिजच्या संघाची घोषणा करण्यात आली. अनुभवी अष्टपैलू किरॉन पोलार्ड दोन्ही संघांचे नेतृत्व करणार आहे. टी-२० संघाचे उपकर्णधारपद निकोलस पूरन, तर एकदिवसीय संघाचे उपकर्णधारपद शाई होप भूषवणार आहे. यष्टीरक्षक-फलंदाज असणार्‍या होपला टी-२० संघात मात्र स्थान मिळाले नाही.

लखनऊ येथे नुकतीच झालेली अफगाणिस्तानविरुद्धची एकदिवसीय मालिका विंडीजने सहजपणे जिंकली. परंतु, टी-२० मालिकेत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, पुढील वर्षी टी-२० विश्वचषक होणार असल्याने विंडीज निवड समितीने संघात फार बदल करणे टाळले आहे.

- Advertisement -

विंडीज संघाच्या भारत दौर्‍याला ६ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. टी-२० मालिकेतील पहिला सामना हैदराबाद, दुसरा सामना तिरुअनंतपुरम (८ डिसेंबर) आणि तिसरा सामना मुंबई (११ डिसेंबर) येथे होणार आहे. त्यानंतर या दोन संघांमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका होईल. या मालिकेचा पहिला सामना चेन्नई (१५ डिसेंबर), दुसरा सामना विशाखापट्टणम (१८ डिसेंबर) आणि तिसरा सामना कटक (२२ डिसेंबर) येथे होईल.

टी-२० संघाबद्दल विंडीजचे प्रशिक्षक फिल सिमन्स म्हणाले, टी-२० मालिकेत आमच्या खेळाडूंना खेळण्याची आणि अनुभव मिळवण्याची आणखी एक संधी मिळेल. अफगाणिस्तानच्या संघाने आम्हाला चांगली झुंज दिली, पण भारत हे पूर्णपणे वेगळे आव्हान आहे. आमचे खेळाडू भारताविरुद्ध कशी कामगिरी करतात याकडे माझे लक्ष असेल.

- Advertisement -

विंडीजचा एकदिवसीय संघ – किरॉन पोलार्ड (कर्णधार), सुनिल अँब्रिस, शाई होप, खेरी पिएर, रॉस्टन चेस, अल्झारी जोसेफ, शेल्डन कॉट्रेल, ब्रँडन किंग, निकोलस पूरन, शिमरॉन हेटमायर, एविन लुईस, रोमारिओ शेफर्ड, जेसन होल्डर, किमो पॉल, हेडन वॉल्श ज्युनिअर.

विंडीजचा टी-२० संघ – किरॉन पोलार्ड (कर्णधार), फॅबिअन अ‍ॅलन, शेल्डन कॉट्रेल, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, किमो पॉल, ब्रँडन किंग, एविन लुईस, खेरी पिएर, निकोलस पूरन, दिनेश रामदीन, शर्फेन रुदरफोर्ड, लेंडल सिमन्स, केसरिक विल्यम्स, हेडन वॉल्श ज्युनिअर.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -