घरक्रीडाप्रेक्षकांविना क्रिकेट अवघड, फुटबॉलला चिंता नाही - बायचुंग

प्रेक्षकांविना क्रिकेट अवघड, फुटबॉलला चिंता नाही – बायचुंग

Subscribe

फुटबॉल खूप वेगाने खेळाला जात असल्याने रिकाम्या स्टेडियममध्ये म्हणजेच प्रेक्षकांविनाही या खेळातील मजा कमी होणार नाही, असे मत भारतीय फुटबॉल संघाचा माजी कर्णधार बायचुंग भुतियाने व्यक्त केले. करोनाच्या पार्श्वभूमीवर जगातील जवळपास सर्व स्पर्धा दोन महिने बंद होत्या. मात्र, आता हळूहळू काही खेळांना पुन्हा सुरुवात होत आहे. मागील शनिवारी जर्मनीतील फुटबॉल स्पर्धा बुंडसलिगाला पुन्हा सुरुवात झाली. करोनानंतर पुन्हा सुरु झालेली ही युरोपमधील पहिलीच फुटबॉल स्पर्धा आहे. परंतु, यातील सामने हे रिकाम्या स्टेडियममध्ये होत आहेत. मात्र, प्रेक्षकांविनाही फुटबॉल जगू शकते असे बायचुंगला वाटते.

प्रेक्षकांविना क्रिकेट खेळणे अवघड आहे, पण फुटबॉलला फारशी चिंता नाही. फुटबॉल हा खेळ खूप वेगाने खेळला जातो. प्रत्येक क्षणाला काहीतरी होत असते. त्यामुळे लोकांना फुटबॉल पाहताना कंटाळा येत नाही. मात्र, क्रिकेटचे तसे नाही. आपण याआधी पाहिले आहे की, कसोटी सामन्यांत प्रेक्षक नसतील, तर लोक टीव्हीवरही हे सामने पाहत नाहीत. फुटबॉलमध्ये मात्र सतत काहीतरी होत असल्याने चाहते या खेळाकडे आकर्षित होतात, असे बायचुंग म्हणाला.

- Advertisement -

तसेच त्याने पुढे सांगितले, मी बुंडसलिगाचे सामने पाहिले. प्रेक्षकांविना सामने होत आहेत याच्याशी जुळवून घेण्यासाठी थोडा वेळ लागेल. हे सामने पाहताना थोडे विचित्र वाटले. मात्र, याचीही सवय होईल. आता आपल्याला लाईव्ह सामने पाहायला मिळत आहेत यात आपण आनंद मानला पाहिजे. कोणत्याही सामन्यांविना मधला काळ खूप अवघड जात होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -