घरक्रीडाWPL Auction 2023: बीसीसीआयकडून स्पर्धेच्या तारखा जाहीर

WPL Auction 2023: बीसीसीआयकडून स्पर्धेच्या तारखा जाहीर

Subscribe

महिला प्रीमियर लीग (Womens Premier League 2023) या स्पर्धेसाठी 13 फेब्रुवारी रोजी खेळाडूंचा लिलाव होणार आहे. महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

महिला प्रीमियर लीग (Womens Premier League 2023) या स्पर्धेसाठी 13 फेब्रुवारी रोजी खेळाडूंचा लिलाव होणार आहे. महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार, 4 ते 26 मार्च 2023 या कालावधीत महिला प्रीमियर लीगचा पदार्पणाचा हंगाम मुंबईत पार पडणार आहे. (Women Premier League 2023 Player Auction list announced know here all details in marathi)

या स्पर्धेतील 22 सामने ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहेत. तसेच, उरलेले सामने डी.वाय. पाटील स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत. येत्या 13 फेब्रुवारी 2023 रोजी मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये एकूण 409 क्रिकेटपटूंसह महिला प्रीमियर लीग खेळाडूंच्या लिलावाची यादी समोर येणार आहे. तसेच, लिलाव प्रक्रियेला सोमवारी दुपारी 2.30 वाजल्यापासून सुरूवात होईल.

- Advertisement -

महिला प्रीमियर लीगमधील खेळाडूंच्या लिलावासाठी एकूण 1 हजार 525 खेळाडूंनी नोंदणी केली आहे. अंतिम यादीत 409 खेळाडूंची छाटणी करण्यात आली. 409 खेळाडूंपैकी 246 भारतीय आणि 163 विदेशी खेळाडू आहेत. यामध्ये सहयोगी राष्ट्रांच्या 8 खेळाडूंचा समावेश आहे. एकूण कॅप्ड खेळाडू 202 आहेत, तर अनकॅप्ड 199 आणि सहयोगी राष्ट्रांच्या 8 खेळाडूंचा समावेश आहे.

भारतीय रकमेनुसार 50 लाख ही सर्वोच्च राखीव किंमत आहे. ज्यामध्ये 24 खेळाडू सर्वोच्च ब्रॅकेटमध्ये निवडले जाणार आहेत. भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, दीप्ती शर्मा आणि भारताची अंडर-19 ट्वेंटी-20 विश्वचषक विजेती कर्णधार शेफाली वर्मा या भारतीय खेळाडूंचा समावेश सर्वोच्च ब्रॅकेटमध्ये आहे.

- Advertisement -

एलिस पेरी, सोफी एक्लेस्टोन, सोफी डेव्हाईन आणि डिआंड्रा डॉटिन यांच्यासारख्या 13 विदेशी खेळाडूंनी स्वत:ची मूळ किंमत 50 लाख ठेवली आहे. खरं तर 40 लाखांच्या मूळ किंमतीसह 30 खेळाडू लिलावाच्या यादीत आहेत.


हेही वाचा – पाकिस्तानच्या ‘या’ खेळाडूची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -