आशिया चषक 2022 स्पर्धेच्या अतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव करत श्रीलंकेने जेतेपद मिळवले. या आशिया चषकात भारतीय संघाला चांगली कामगिरी करता आली नाही. मात्र, असे असले तरी, पुरुष क्रिकेटसोबतच महिलांच्या क्रिकेटमध्येही अगदी उच्च दर्जाचा खेळ पाहायला मिळत आहे. दरम्यान, नुकताच पुरुषांचा आशिया कप 2022 पार पडल्यानंतर महिला आशिया कप 2022 पार पडणार आहे. बांग्लादेशमध्ये महिला आशिया कप 2022 होणार आहे.
बांग्लादेशमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश, मलेशिया, युएई आणि थायलंड हे 7 संघ सहभागी होणार आहेत. महिला आशिया कप 2022 ही स्पर्धा राऊंड रॉबीन पद्धतीने ही टूर्नामेंट पार पडणार आहे. या मालिकेती सामने हे बांग्लादेशच्या एसआयसीएस ग्राऊंड 1 आणि एसआयसीएस ग्राऊंड 2 याठिकाणी पार पडणार आहेत.
महिला आशिया कप 2022 ही स्पर्धा 1 ऑक्टोबरपासून ते 15 ऑक्टोबरपर्यंत पार पडणार आहे. भारतीय महिला संघ आपला सलामीचा सामना श्रीलंका संघासोबत 1 ऑक्टोबर रोजी खेळणार आहे. त्यानंतर 7 ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे.
दरम्यान, अनेक आंतरराष्ट्रीय सामने असो वा स्थानिक स्पर्धा यामध्ये महिला खेळाडू उत्तम कामगिरी करताना दिसत आहे. त्यामुळे महिला क्रिकेट स्पर्धांही क्रिकेटप्रेमी आवडीने पाहत आहेत.
महिला आशिया कप 2022 वेळापत्रक
दिनांक सामना ठिकाण वेळ
1 ऑक्टोबर बांग्लादेश विरुद्ध थायलंड एसआयसीएस ग्राऊंड 2 9 AM
1 ऑक्टोबर भारत विरुद्ध श्रीलंका एसआयसीएस ग्राऊंड 2 1.30 PM
2 ऑक्टोबर पाकिस्तान विरुद्ध मलेशिया एसआयसीएस ग्राऊंड 2 9 AM
2 ऑक्टोबर श्रीलंका विरुद्ध युएई एसआयसीएस ग्राऊंड 2 1.30 PM
3 ऑक्टोबर पाकिस्तान विरुद्ध बांग्लादेश एसआयसीएस ग्राऊंड 2 9 AM
3 ऑक्टोबर भारत विरुद्ध मलेशिया एसआयसीएस ग्राऊंड 2 1.30 PM
4 ऑक्टोबर श्रीलंका विरुद्ध थायलंड एसआयसीएस ग्राऊंड 2 9 AM
4 ऑक्टोबर भारत विरुद्ध युएई एसआयसीएस ग्राऊंड 2 1.30 PM
5 ऑक्टोबर युएई विरुद्ध मलेशिया एसआयसीएस ग्राऊंड 2 1.30 PM
6 ऑक्टोबर पाकिस्तान विरुद्ध थायलंड सीआयसीएस ग्राऊंड 1 9 AM
6 ऑक्टोबर बांग्लादेश विरुद्ध मलेशिया सीआयसीएस ग्राऊंड 1 1.30 PM
7 ऑक्टोबर थायलंड विरुद्ध युएई एसआयसीएस ग्राऊंड 1 9 AM
7 ऑक्टोबर भारत विरुद्ध पाकिस्तान एसआयसीएस ग्राऊंड 1 1.30 PM
8 ऑक्टोबर श्रीलंका विरुद्ध मलेशिया एसआयसीएस ग्राऊंड 1 9 AM
8 ऑक्टोबर भारत विरुद्ध बांग्लादेश एसआयसीएस ग्राऊंड 1 1.30 PM
9 ऑक्टोबर थायलंड विरुद्ध मलेशिया एसआयसीएस ग्राऊंड 1 9 AM
9 ऑक्टोबर पाकिस्तान विरुद्ध युएई एसआयसीएस ग्राऊंड 1 1.30 PM
10 ऑक्टोबर श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश एसआयसीएस ग्राऊंड 1 9 AM
10 ऑक्टोबर भारत विरुद्ध थायलंड एसआयसीएस ग्राऊंड 1 1.30 PM
11 ऑक्टोबर बांग्लादेश विरुद्ध युएई एसआयसीएस ग्राऊंड 1 9 AM
11 ऑक्टोबर पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका एसआयसीएस ग्राऊंड 1 1.30 PM
13 ऑक्टोबर सेमीफायनल 1 एसआयसीएस ग्राऊंड 1 9 AM
13 ऑक्टोबर सेमीफायनल 2 एसआयसीएस ग्राऊंड 1 1.30 PM
15 ऑक्टोबर फायनल एसआयसीएस ग्राऊंड 1 1.30 PM
हेही वाचा – ऑस्ट्रेलियाचा 4 गडी राखून भारतावर विजय, तर रोहित शर्माची ‘या’ विक्रमाशी बरोबरी