घरक्रीडाWomen’s Asia Cup T20 : भारत आणि श्रीलंकेत रंगणार पहिला सामना

Women’s Asia Cup T20 : भारत आणि श्रीलंकेत रंगणार पहिला सामना

Subscribe

महिला आशिया चषक क्रिकेट स्पर्धेला आजपासून सुरुवात होत आहे. हा आशिया चषक बांग्लादेशमध्ये खेळवला जाणार आहे. आशिया चषकातील पहिला सामना भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात होणार आहे. दुपारी 1 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे.

महिला आशिया चषक क्रिकेट स्पर्धेला आजपासून सुरुवात होत आहे. हा आशिया चषक बांग्लादेशमध्ये खेळवला जाणार आहे. आशिया चषकातील पहिला सामना भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात होणार आहे. दुपारी 1 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. सिल्हेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर या स्पर्धेच्या सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे आशिया चषकात 7 संघ खेळणार असून प्रत्येक सामन्यात संघर्ष पाहायला मिळणार आहे. (Womens Asia Cup T20 India vs Sri Lanka first match)

भारतीय महिला संघाने आत्तापर्यंत 6 वेळा आशिया चषक जिंकला आहे. याशिवाय मागील काही सामन्यांमध्येही भारताच्या महिला खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे यंदाचेही आशिया चषकाचे विजेतेपद भारतच पटकावणार असा दावा माजी खेळाडूंकडून केला जात आहे.

- Advertisement -

भारतीय महिला संघ :

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, एस मेघना, स्नेह राणा, डी हेमलता, मेघना सिंग, रेणुका ठाकूर, पूजा वस्त्राकर, राजेश्वरी गायकवाड, राधा यादव, किरण नवगिरे.

- Advertisement -

श्रीलंका महिला संघ :

चमारी अथापथु (कर्णधार), हसिनी परेरा, हर्षिता समरविक्रमा, कविशा दिलहरी, निलाक्षी डी सिल्वा, अनुष्का संजीवनी (डब्ल्यूके), कौशिनी नुथ्यांगा, ओशाधी रणसिंघे, मलशा शेहानी, मधुशिका मेत्थानंद, इनोका रणवीरा, रश्मी सिल्वा, सुधिगन कुमारी, सुधिका कुमारी, कौशिनी. कुलगीना कुमारी, थारिका शेवंडी


हेही वाचा – गुजरातमध्ये 36 व्या नॅशनल गेम्स 2022 स्पर्धांना सुरुवात; देशभरातून 7000 स्पर्धकांचा समावेश

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -