women’s day : भारताला विश्वविजेता करण्याची जबाबदारी या महिलांवर, २०१७ मधील स्वप्न पूर्ण होणार का?

Women's day indian womens team responsibility of making India a world champion in cricket
women's day : भारताला विश्वविजेता करण्याची जबाबदारी या महिलांवर, २०१७ मधील स्वप्न पूर्ण होणार का?

यंदाच्या एकदिवसीय विश्वचषकात भारतीय महिला क्रिकेट संघाने शानदार सुरुवात केली. संघाने पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा १०७ धावांनी पराभव केला होता. भारतीय महिला क्रिकेटपटूंनी गेल्या वर्षी T20 विश्वचषकात जे भारतीय पुरुष संघ करू शकला नाही ते करून दाखवले. पाकिस्तानने भारताच्या संघाला पहिल्यांदाच या वर्षीच्या पुरुषांच्या टी२० विश्वचषकात पराभूत केलं आहे. महिला क्रिकेट संघ गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष करत आहे.

महिला संघाने २०१७ च्या विश्वचषकात चांगली कामगिरी करुन सर्वांची मने जिंकली होती. भारताने राऊंड रॉबिन प्रकारात 10 पैकी 7 सामने जिंकले. जिंकले. भारताने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. मात्र, अंतिम फेरीत इंग्लंडकडून संघाला पराभवाचा सामना करावा लागला आणि विजेतेपदापासून वंचित राहिला आहे.

1. मिताली राज

मिताली राज २०१७ सारखेच यावर्षीसुद्धा संघाची कमान संभाळली आहे. मिताली राजने मैदानावर उतरल्यानंतर एक विश्वविक्रम आपल्या नावे केला असून ती पहिली खेळाडू बनली आहे. तिने ६ एकदिवसीय सामने खेळले आहेत. तिच्यापूर्वी सचिन तेंडूलकर आणि पाकिस्तानच्या जावेद मियादाद यांनी हा विक्रमक केला आहे.

मितालीने दोनवेळा भारतीय संघासाठी महिला विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना खेळला आहे, परंतु तिला आतापर्यंत आपल्या संघाला विजेते बनवता आले नाही. हा तिचा शेवटचा सामना असू शकतो. यामुळे तिला तिला विश्वचषक ट्रॉफीसह कारकिर्दीचा शेवट करायचा आहे. मितालीला 2004 मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित आलंय.

2. हरमनप्रीत कौर

हरमनप्रीत कौर अष्टपैलू खेळाडू भारतीय संघाची उपकर्णधार आहे. २०१७ मध्ये तिला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. नोव्हेंबर २०१८ मध्ये महिला टी२० आंतरराष्ट्रीय स्पर्धेत शतक झळकावले असून ती पहिलीच महिला खेळाडू ठरली आहे. तिच्याकडून यंदाच्या विश्वचषकात खूप अपेक्षा आहे.

3. स्मृती मंधाना

संघातील डावखुरी सलामीवीर स्मृती मांधना आतापर्यंत अनेक सामने उत्तम खेळली आहे. तसेच २०२१ मध्ये तिला सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटू म्हणून निवडण्यात आले आहे. यापूर्वी तीला २०१८ मध्ये सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटू आणि सर्वोत्कृष्ट महिला एकदिवसीय क्रिकेटपटू घोषित करण्यात आले होते. हा पुरस्कार दोनदा जिंकणारी मानधना ही पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली. स्मृती मांधनाने २०२१ मध्ये २२ आंतरराष्ट्रीय सामनने खेळले असून या सामन्यात ३८.८६ च्या सरासरीने ८५५ धावा केल्या आहेत.

4. झुलन गोस्वामी

यंदाच्या विश्वचषकामध्ये झुलन गोस्वामी खेळणार असून ती सर्वात अधिक वय असलेली खेळाडू आहे. झुलनचे वय ३९ वर्ष ९४ दिवसांपेक्षा जास्त होते जेव्हा तीने मालिका खेळण्यास सुरुवात केली. हा पुरस्कार दोनदा जिंकणारी मानधना ही पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली. झुलन जास्त विकेट घेणारी पहिलीच गोलंदाज ठरली आहे. मिताली राजपूर्वी झुलन भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधारही राहिली आहे.

5. दीप्ती शर्मा

भारतीय संघाची दिग्गज अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्माने पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात ४० मौल्यवान धावा केल्या आणि एक विकेटही घेतली. दीप्तीने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली. भविष्यातही या स्पर्धेत अशीच अष्टपैलू भूमिका बजावण्याची जबाबदारी तिच्यावर असेल. दीप्तीने ७० एकदिवसीय सामन्यांमध्ये १७६० धावा केल्या आहेत. तसेच ८० विकेट घेतले आहेत.

6. पूजा वस्त्राकार

पूजा सहस्त्राकार पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात सामनावीर ठरली. टीम इंडियाचा डाव सांभाळत ११४ धावांवर ६ विकेट घेतले आहेत. तसेच ६७ धावा पूजाने काढल्या. पूजा वेगवान गोलंदाजी करते. परंतु दुखापतीमुळे तिला सामन्यात गोलंदाजी करता आली नाही.

7. स्नेह राणा

भारताची अष्टपैलू खेळाडू 28 वर्षीय खेळाडूने स्नेह राणा अर्धशतक झळकावल्यानंतर दोन विकेट्सही घेतल्या होत्या. यानंतर तिने नाबाद ५३ धावांची खेळी केली होती. स्नेह राणा संघाचा एक महत्त्वाचा भाग असू शकते. स्नेहने २०१४ मध्ये भारताकडून आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले, परंतु काही काळानंतर ती जखमी झाली आणि संघाबाहेर झाली. यानंतर २०१६ मध्ये तिला संघातून वगळण्यात आले. परंतु आपल्या मेहनतीच्या जोरावर तिने संघात पुनरागमन केलं आहे.


हेही वाचा : IND vs SL: दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी अक्षर पटेल भारतीय संघात दाखल ; कुलदीप, जयंतला बाहेरचा रस्ता