घरक्रीडामहिला हॉकी विश्वचषक २०१८ : भारतासमोर आयर्लंडचे आव्हान

महिला हॉकी विश्वचषक २०१८ : भारतासमोर आयर्लंडचे आव्हान

Subscribe

महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत भारत आज आयर्लंडविरूद्ध सामना लढणार असून उपांत्यफेरीत प्रवेशासाठी भारताला आजचा सामना जिंकणे अनिवार्य आहे. आजचा सामना जिंकणारा संघ उपांत्यफेरीत स्पेनविरूद्ध खेळणार आहे.

लंडनमध्ये सुरू असलेल्या महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या बाद फेरीत भारताने इटलीला नमवत विश्वचषकात आपले आव्हान कायम ठेवले आहे. आज भारताचा उपांत्यपूर्व फेरीतील सामना आयर्लंडविरूद्ध रंगणार असून उपांत्यफेरीत प्रवेशासाठी भारताला आजचा सामना जिंकणे अनिवार्य आहे. आज होणाऱ्या सामन्यात जिंकणारा संघ ४ ऑगस्टला उपांत्य फेरीत स्पेनविरूद्ध खेळेल.

- Advertisement -

आयर्लंड मानसिकदृष्ट्या भक्कम

यंदाच्या विश्वचषकात भारत याआधी गटनिहाय फेरीत आयर्लंडविरूद्ध एका सामन्यात पराभूत झाला आहे. तर मागील वर्षीच्या हॉकी विश्व लीगच्या उपांत्य फेरीतही आयर्लंडने भारताला २-१ ने नमवले होते. त्यामुळे जरी भारत जागतिक क्रमवारीत आर्यंलडपेक्षा वरच्या स्थानावर असला, तरी मानसिकदृष्ट्या आयर्लंड भक्कम असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात भारताला आयर्लंडला पराभूत करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे.

विजय मालिका कायम ठेवू – कर्णधार राणी रामपाल

भारताने आतापर्यंत विश्वचषकात फक्त इटलीविरूद्ध ३-० ने विजय मिळवला असून त्याआधीचा एक सामना टाय झाला आहे तर एका सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला आहे. असे असतानाही “आम्ही आजचा सामना जिंकत उपांत्यफेरी गाठू आणि आमची विजय मालिका कायम ठेवू” असा विश्वास भारताची कर्णधार राणी रामपालने व्यक्त केला आहे.

rani rampal
कर्णधार राणी रामपाल
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -