महिला T-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ जाहीर, हरमनप्रीतकडे नेतृत्व

Harmanpreet Kaur, Smriti Mandhana
हरमनप्रीत कौर आणि स्मृती माधंनाच्या हातात भारतीय संघाची कमान

ऑस्ट्रेलियामध्ये २१ फेब्रुवारी पासून होणाऱ्या महिला टी-२० वर्ल्ड कपसाठी बीसीसीआयने आज महिला संघाची घोषणा केली आहे. १५ खेळांडूच्या या यादीत बंगालची फलंदाज रिचा घोष हीचा समावेश करण्यात आला आहे. तर हरमनप्रीत कौरकडे भारतीय संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे. रिचा वगळता इतर कोणतेही मोठे बदल संघात करण्यात आलेले नाहीत. विशेष म्हणजे हरयाणातील १५ वर्षीय शालेय विद्यार्थीनी शेफाली वर्माचा देखील संघात समावेश करण्यात आला आहे.

टी-२० वर्ल्डकपच्या आधी ऑस्ट्रेलियातच तीन देशांची ेक दिवसीय मालिका होणार आहे. या मालिकेसाठीही निवड समितीने संघाची घोषणा केली आहे. १६ खेळाडून असलेल्या या संघात नुझात परवीनचा समावेश करण्यात आला आहे. ३१ जानेवारी पासून याची सुरुवात होईल.

टी-२० वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ –

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिक्स, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, वेदा कृष्णमूर्ती, रिचा घोष, तानिया भाटिया, पूनम यादव, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, शिखा पांडे, पूजा वस्तरकर आणि अरुंधती रेड्डी.

तिरंगी मालिकेसाठीचा भारतीय संघ –

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिक्स, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, वेदा कृष्णमूर्ती, रिचा घोष, तानिया भाटिया, पूनम यादव, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, शिखा पांडे, पूजा वस्तरकर, अरुंधती रेड्डी आणि नुझत परवीन