महिला आयपीएलच्या चुरशीच्या सामन्यात सुपरनोवासची ट्रेलब्लेज़रवर ३ गडी राखून मत

womens ipl match
सुपरनोवास विरुद्ध ट्रेलब्लेज़र या सामन्यातील एक क्षण

आयपीएल वूमेन्स चॅलेंज २०१८ मध्ये आज ट्रेलब्लेज़रविरुद्ध सुपरनोवास असा सामना वानखेडेत रंगला होता. ज्यात सुपरनोवासने ३ गडी राखत ट्रेलब्लेजरवर विजय मिळवला. टॉस जिंकत हरमनप्रीतने गोलंदाजी निवडली. २० ओव्हर्समध्ये ६ विकेटसह १३० रनांचे लक्ष्य ट्रेलब्लेज़रने सुपरनोवाससमोर ठेवले. त्यानंतर सुपरनोवासने २० ओव्हर्समध्ये हे लक्ष्य गाठत ३ गडी राखून विजय मिळवला.
हरमनप्रीतने आपल्या संघाला आज झालेल्या या चुरशीच्या सामन्यात विजय मिळवून दिला. कौरने टॉस जिंकत गोलंदाजीचा घेतलेला निर्णय सुपरनोवासला चांगलाच फायद्याचा ठरला. सुंदर गोलंदाजी करत सुपरनोवासने ट्रेलब्लेज़रला अवघ्या १३० रनातच रोखले. यामध्ये ट्रेलब्लेज़रचे सुरुवातीचे विकेट लवकर पडले. मात्र, नंतर सुझी आणि जेमिमाह यांच्या सुंदर भागीदारीमुळे त्यांची नाव किनारी लागली आणि १३० रनांचे लक्ष्य सुपरनोवाससमोर उभे राहिले. तसेच सुपरनोवासकडून गोलंदाजी करताना मेगन आणि इल्लीसे पेरी यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या. तर राजेश्वरी गायकवाड आणि अनुजा पाटील यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. यानंतर १३० रनांचे लक्ष्य गाठण्यासाठी आलेले सुपरनोवासच्या ओपनिंग जोडीने चांगली सुरुवात केली. मात्र ४६ रनांवर मिताली राजची विकेट घेत एकता बिश्तने ट्रेलब्लेज़रला पहिले यश मिळवून दिले. यानंतर अनुक्रमे ७, ९ आणि १५व्या ओव्हरला पुढील विकेट गेले. त्यानंतर अत्यंत चुरशीच्या सामन्यात अगदी ३ बॉलमध्ये ३ रन हवे असताना पूजा वस्त्राकरने शेवटच्या बॉलला विजयी धाव घेत सुपरनोवासला विजय मिळवून दिला.