Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर क्रीडा महिला महाराष्ट्र केसरीचा अंतिम सामना; वैष्णवी पाटील वि. प्रतीक्षा बागडी आमनेसामने

महिला महाराष्ट्र केसरीचा अंतिम सामना; वैष्णवी पाटील वि. प्रतीक्षा बागडी आमनेसामने

Subscribe

मुंबई : महिला महाराष्ट्र केसरीचा अंतिम सामना आज संध्याकाळी वैष्णवी पाटील आणि प्रतीक्षा बागडी यांच्यात संध्याकाळी ५ वा. होणार आहे. पहिल्यांदाच पार पडणाऱ्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत महाराष्ट्र केसरीची गदा कोण उचलणार याकडे अख्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

कल्याण बाजूलाच असलेल्या मांगरूळ गावची पैलवान वैष्णवी पाटील हिने बजरंग तालीम येथे पंढरीनाथ ढोणे, वसंत साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव केला आहे. लहानपणा पासूनच कुस्तीची आवड असणाऱ्या वैष्णवी पाटील हिने आतापर्यंत सहा ते सात राज्य, राष्ट्रीय स्पर्धा गाजवल्या आहेत. वैष्णवी पाटीलचे वडील दिलीप पाटील आणि आई पुष्पा पाटील यांच्या घरातही पहिल्यापासूनच कुस्तीचा ओढा होता. त्यामुळे वैष्णवीला आवड निर्माण झाली.

- Advertisement -

राज्य, राष्ट्रीय लेव्हल आणि आंतरराष्ट्रीय लेव्हल पर्यंत माझ्या आई-वडिलांनी बाळगलेले स्वप्न मला पूर्ण करायचे आहे. महाराष्ट्र केसरी या स्पर्धेपर्यंतच मला न थांबता मला आंतरराष्ट्रीय आणि ऑलम्पिक लेव्हलपर्यंत मजल मारायची आहे, असे वैष्णवीचे म्हणणे आहे.

वैष्णवी पाटील आणि प्रतीक्षा बागडी यांच्यात पहिल्यांदाच महाराष्ट्र महिला केसरीचा सामना होणार असून महाराष्ट्र केसरीची गदा उचलण्याचा मान कोणत्या महिला पैलवानाला मिळतो याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्र महिल केसरीचा सामना आज संध्याकाळी ५ वा. होणार आहे.

- Advertisement -

उपांत्य फेरी सामने
पहिल्या उपांत्य फेरीत सांगलीची प्रतीक्षा बागडी आणि कोल्हापूरची पैलवान अमृता पुजारीशी झाली. या लढतीत प्रतीक्षाने 9-2 ने अमृताचा पराभव करत महिला महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीत धडक मारली. दुसऱ्या उपांत्य लढतीत कल्याणची वैष्णवी पाटील आणि कोल्हापूरची पैलवान वैष्णवी कुशप्पा या दोघींमध्ये झाली. या लढतीत 11-1 ने वैष्णवीने कुशप्पाचा पराभव करत अंतिम फेरी प्रवेश केला.

दोन्ही पैलवान रुम पार्टनर
प्रतीक्षा बागडी आणि वैष्णवी पाटील या हरियाणाच्या इसारमध्ये जवळपास 5-6 महिने रूम पार्टनर असल्याचे समजते. त्यामुळे दोघींना एकमेकांच्या डावपेचांबद्दल अंदाज आहे. त्यामुळे या दोघी महिला महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यात कोणता डावपेच वापरणार आणि आपल्या मैत्रिणीचा पराभव करण्याचा प्रयत्न करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisment -