घरक्रीडाWomen's Maharashtra Kesari : पहिल्यांदाच 'महिला महाराष्ट्र केसरी' थरार सांगलीत रंगणार

Women’s Maharashtra Kesari : पहिल्यांदाच ‘महिला महाराष्ट्र केसरी’ थरार सांगलीत रंगणार

Subscribe

मुंबई : महाराष्ट्र पुरुष पैलवानांच्या बरोबरीने महिला पैलवानांनाही प्रोत्साहन देण्यासाठी पहिल्यांदाच ‘महिला महाराष्ट्र केसरी’चे आयोजन करण्यात आले आहे. सांगली जिल्हा तालीम संघाच्या वतीने महिला महाराष्ट्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यात आज महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या पत्रकार परिषदेत महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा निर्णय घेण्यात आला.

पुण्यात पार पडलेल्या ६५व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या पाश्वभूमीवर आता महाराष्ट्रात ‘महिला महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचा थरारही कुस्तीप्रेमींना अनुभवता येणार आहे. महिलांच्या कुस्तीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन सांगलीत करण्यात आले आहे असून याच्या तारखाही आज महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या पत्रकार परिषदेच जाहीर करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

या बैठकीत महिला महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा येत्या २३ व २४ मार्च रोजी सांगलीत रंगणार आहे. सांगली जिल्हा तालीम संघाच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष नामदेव मोहिते यांनी दिली आहे.

कुस्तीगीर परिषदेच्या माहितीनुसार महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत दहा वजनी गटासह खुल्या गटांतील कुस्तीपटूंचा सहभाग असणार आहे. त्यानुसार 50, 53, 55, 57, 59, 62, 68, 72 आणि 76 असे वजनी गट असतील. महाराष्ट्र केसरीसाठी 65 वजनी गटावरील कुस्तीगीर खिताबासाठी लढणार आहेत. ही स्पर्धा फक्त मॅटवर होणार आहे.

- Advertisement -

महिला कुस्तीनंतर कुमार गटाच्याही होणार स्पर्धा
महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेनंतर लगेचच 25 आणि 26 मार्चला कोल्हापूरात कुमार गटाच्या राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धाही पार पडणार आहेत. यानंतर वरिष्ठ गटाच्या राज्यस्तरीय ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धा 27 आणि 28 मार्च रोजी कै. मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्र इथे अमोल बुचडे आणि अमोल बराटे यांच्या वतीने आयोजित करण्यात आल्या आहेत.

पहिल्या महिला महाराष्ट्र केसरीचा मान कोणाला मिळणार
पहिल्यांदाच होणाऱ्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील विजयी महिला कुस्तीगीरास महिला केसरी खिताब आणि चांदीची गदा देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद पुणे कार्याध्यक्ष तसेच सांगली जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष पैलवान नामदेवराव मोहिते यांनी माहिती दिली आहे. तसेच महाराष्ट्र केसरीचा खिताब जिंकणाऱ्या पहिल्या महिला कुस्तीगीराची इतिहासात नोंद होणार आहे. कारण या स्पर्धेचे हे यंदाचे पहिलेच वर्ष आहे. त्यामुळे पहिली महाराष्ट्र केसरी महिला कोण होणार याकडे आता सर्व कुस्तीप्रेमींचे लक्ष लागले आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -