घरक्रीडामहिला प्रीमियर लिग : मुंबईच्या रणरागिणींनी कोरले पहिल्या WPL चषकावर नाव; दिल्ली...

महिला प्रीमियर लिग : मुंबईच्या रणरागिणींनी कोरले पहिल्या WPL चषकावर नाव; दिल्ली कॅपिटल्सवर 7 गड्यांनी केली मात

Subscribe

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून मुंबईत आयोजित केलेल्या डब्लूपीएल अर्थात पहिल्या महिला प्रीमियर लीगचे यशस्वी आयोजन पूर्ण झाले असून मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) रुपात पहिला विजेता मिळाला आहे. मुंबईच्या ब्रेबॉन स्टेडियमवर पार पडलेल्या अंतिम सामन्यात मुंबईने ७ विकेट्सने दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capital) पराभव केला आहे.

दिल्ली कॅपिटल्स महिला (Delhi Capitals Women) संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला, पण दिल्लीची सुरुवात खराब झाली. शफाली वर्मा आणि अॅलिस कॅप्सी या दोघी १२ धावसंख्येवर बाद झाल्या. त्यानंतर थोड्याथोड्या अंतराने विकेट पडत राहिल्या. कर्णधार मेग लॅनिंगने सर्वाधिक 35 धावा केल्या. याशिवाय मारिझान कॅप (18), शिखा पांडे (27) आणि राधा यादव हिने (२७) धावांचे योगदान दिले. इतर एकही फलंदाज दोन आकडी धावसंख्या करू शकला नाही. एलिस कॅप्सी, अरुंधती रेड्डी आणि तानिया भाटिया हे फलंदाज शून्यावर बाद झाले. त्यामुळे दिल्ली संघाने निर्धारित 20 षटकात 9 विकेट्स गमावत 131 धावांपर्यंतच मजल मारली. यावेळी मुंबईकडून हेली मॅथ्यूजने शानदार गोलंदाजी केली. तिने 4 षटकात 2 निर्धाव षटके टाकताना फक्त 5 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. याशिवाय 3 विकेट्स आणि अमेलिया केर हिला 2 विकेट्स मिळाल्या.

- Advertisement -

दिल्लीकडून मिळालेल्या धावांचा पाठलाग कताना मुंबई इंडियन्स संघाची सुरुवातही खराब झाली. यास्तिका भाटिया आणि हेली मॅथ्यूज झटपट बाद झाल्यामुळे मुंबईच्या २३ धावांवर २ विकेट होत्या. यानंतर नॅट सायव्हर-ब्रंट आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी डाव सांभाळला. या दोघींमध्ये तिसऱ्या विकेटसाठी 72 धावांची भागिदारी झाली. हरमनप्रीत 37 धावांवर बाद झाल्यानंतर ब्रंटने शेवटपर्यंत झुंज देताना मुंबईकडून सर्वाधिक 60 धावा केल्या. याशिवाय मेली केर 14 धावा केल्या. यांनी मुंबई इंडियन्सला महिला प्रीमियर लीगचे पहिल्या हंगामाचे विजेतेपद मिळवून दिले. यावेळी दिल्लीकडून राधा यादव आणि जेस जोनासन यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली.

महिला प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्यातील पुरस्कार, बक्षिसांची रक्कम आणि सामन्यादरम्यान झालेल्या मोठ्या विक्रमांवर एक नजर टाकूया.
1. विजेता संघ – मुंबई इंडियन्स 6 कोटी रुपये
2. उपविजेता संघ – दिल्ली कॅपिटल्स 3 कोटी
3. ऑरेंज कॅप (सर्वाधिक धावा करणारा) – मेग लॅनिंग (345 धावा) 5 लाख रुपये
4. पर्पल कॅप (सर्वाधिक बळी घेणारा) – हेली मॅथ्यूज (16 विकेट) 5 लाख रुपये
5. पॉवर स्ट्रायकर ऑफ द सीझन – सोफी डिव्हाईन (१३ षटकार) ५ लाख रुपये
6. कॅच ऑफ द सीझन हरमनप्रीत कौर विरुद्ध यूपी वॉरियर्स (सामना 15) 5 लाख रुपये
7. हंगामातील सर्वात मौल्यवान खेळाडू हेली मॅथ्यूज (271 धावा आणि 16 विकेट) 5 लाख रुपये
8. उदयोन्मुख खेळाडू यास्तिका भाटिया (214 धावा आणि 13 विकेट) 5 लाख रुपये
9. फेअरप्ले पुरस्कार मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स
10. सामनावीर (अंतिम) नॅट सायव्हर ब्रंट 2.50 लाख
11. पॉवर स्ट्रायकर ऑफ द मॅच (फायनल) राधा यादव (2 षटकार) 1 लाख रुपये

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -