घरक्रीडाWomens T20 Challenge : शर्मिनचा खतरनाक थ्रो; 'या' खेळाडूला केले रनआऊट

Womens T20 Challenge : शर्मिनचा खतरनाक थ्रो; ‘या’ खेळाडूला केले रनआऊट

Subscribe

वुमेन्स टी 20 चॅलेंज (Womens T20 Challenge) स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली आहे. सुपरनोवाज आणि ट्रेलब्लेजर्समध्ये (Supernovas vs Trailblazers) यांच्यात पहिला सामना सुरु आहे.

वुमेन्स टी 20 चॅलेंज (Womens T20 Challenge) स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली आहे. सुपरनोवाज आणि ट्रेलब्लेजर्समध्ये (Supernovas vs Trailblazers) यांच्यात पहिला सामना सुरु आहे. या सामन्यात एक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात शर्मिन अख्तरने केलेल्या अचूक बुलेट थ्रो वर डिएंड्रा डॉटिन रनआऊट झाली. तिने 17 चेंडूत 32 धावा काढल्या. यात पाच चौकार आणि एक षटकार होता.

पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या स्टेडियवर ही मॅच सुरु आहे. प्रिया पुनिया (22) आणि डिएंड्रा डॉटिनने आज चांगली सुरुवात करुन दिली. सुपरनोवाज टीमची कॅप्टन हरमनप्रीत कौरने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुपरनोवाजने प्रथम फलंदाजी करताना 163 धावा केल्या आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – IPL 2022: ‘अपना टाईम आएगा…’, भाऊ अर्जुनसाठी सारा तेंडुलकरची भावनिक पोस्ट

दोन्ही सलामीवीर बाद झाल्यानंतर हरलीन देओल आणि कॅप्टन हरमनप्रीत कौरने महत्त्वपूर्ण भागीदारी केली. हरलीनने उत्तम फटकेबाजी करत 19 चेंडूत 35 धावा काढल्या. यात पाच चौकार मारल्या आहेत.

- Advertisement -

हरमनप्रीत 37 धावांवर रनआऊट झाली. 29 चेंडूत 37 धावांची खेळी करणाऱ्या हरमनप्रीतने चार चौकार लगावले. हरमनप्रीत 19 व्या षटकापर्यंत खेळपट्टीवर होती. सुपरनोवाजने निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 163 धावा केल्या.

सुपरनोवाज संघ

हरमनप्रीत कौर (कर्णधार), डिएंड्रा डॉटिन, प्रिया पूनिया, सुने लूस, हरलीन देओल, तानिया भाटिया, सोफी एक्लेस्टोन, एलेना किंग, वी चंदू, पूजा वस्त्राकर, मेघना सिंह.

ट्रेलब्लेजर्स संघ

स्मृती मांधना (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, पूनम यादव, हॅली मॅथ्यूज, सोफी डंकली, राजेश्वरी गायकवाड, अरुंधती रेड्डी, सलमा खातून, रेणुका सिंह, ऋचा घोष, शर्मिन अख्तर.


हेही वाचा – IPL 2022: ‘अपना टाईम आएगा…’, भाऊ अर्जुनसाठी सारा तेंडुलकरची भावनिक पोस्ट

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -