मुंबई : Womens U19 T20 World Cup च्या स्पर्धेला शनिवार, 18 जानेवारीपासून सुरूवात होत आहे. यंदा मलेशिया येथे टी-20 वर्ल्ड कपचे आयोजन करण्यात आले आहे. या वर्ल्ड कपमधील भारताचा पहिला सामना वेस्ट इंडिजविरूद्ध होणार आहे. या वर्ल्डकपसाठी दोन गट पाडण्यात आले आहेत. त्यानुसार, ‘अ’ गट आणि ‘ब’ गट असून, प्रत्येक गटांत चार संघ असणार आहेत. तीन सामन्यांनी वर्ल्ड कपच्या दुसऱ्या आवृत्तीला सुरूवात करण्यात येणार आहे. (Womens U19 T20 World Cup 2025 when and where the matches happens of team india)
महिलांच्या 19 वर्षांखालील टी-20 वर्ल्ड कपमधील भारताचा पहिला सामना वेस्ट इंडिजविरूद्ध 19 फेब्रुवारी रोजी होणार आहे. चार गटांमधून प्रत्येकी ३ संघ हे Super Six साठी पात्र ठरतील. 12 संघांची पुन्हा दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे. ग्रुप 1 मध्ये अ व ड गटातील अव्वल तीन संघ असतील, तर ग्रुप 2 मध्ये ब व क गटातील अव्वल तीन संघ असतील.
शिवाय, सुपर सिक्समध्ये प्रत्येक विजय, गुण व नेट रन रेट महत्त्वाचा ठरणार आहे. या गटात प्रत्येक संघ दोन सामने खेळतील आणि त्यानंतर दोन्ही ग्रुपमधील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. उपांत्य फेरीचे सामने 31 जानेवारीला होणार असून फायनल 2 फेब्रुवारीला होणार आहे.
या टी-20 वर्ल्ड कपमध्ये एकूण 8 संघ खेळणार आहेत. यामध्ये भारत, मलेशिया, श्रीलंका, वेस्ट वेंडिज, इंग्लंड, आयर्लंड, पाकिस्तान, अमेरिका या संघांचा समावेश आहे.
- ‘अ’ गट – भारत, मलेशिया, श्रीलंका, वेस्ट वेंडिज
- ‘ब’ गट – इंग्लंड, आयर्लंड, पाकिस्तान, अमेरिका
कुठे पाहाता येईल सामना?
- जीओ स्टार या डिजीटल प्लॅटफॉर्मवर महिलांच्या 19 वर्षांखालील टी-20 वर्ल्ड कपमधील सर्व सामने पाहायला मिळणार आहेत.
- सेमीफायनल व फायनलचा सामना आपल्याला स्टार स्टोर्ट्स 2 या टीव्ही चॅनेलवर पाहायला मिळणार आहे.
भारताचे सामने कधी होणार?
- 19 जानेवारी 2025 : भारतविरूद्ध वेस्ट इंडिज, सकाळी 8 वाजता होणार आहे.
- 21 जानेवारी 2025 : भारतविरूद्ध मलेशिया, दुपारी 12 वाजता होणार आहे.
- 23 जानेवारी 2025 : भारतविरूद्ध श्रीलंका, दुपारी 12 वाजता होणार आहे.
भारतीय महिला संघ
गोंगडी त्रिशा, निकी प्रसाद (कर्णधार), सानिका चाळके (उपकर्णधार), आयुषी शुक्ला, भाविका अहिरे, इश्वरी अवसारे, व्हिजे जोशिस्ता, जी कामालिनी, द्रीथी केसरी, अनादिता किशोर, मिताली विनोद, परूणीका सिसोडिया, वैष्णवी शर्मा, शबनम शकील, सोनम यादव
हेही वाचा – Champions Trophy 2025 Ticket Price : फक्त 310 रुपयांत पाहता येणार चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने