घरक्रीडाजागतिक बॅडमिंटन स्पर्धा : दुहेरीत भारतासाठी संमिश्र निकाल

जागतिक बॅडमिंटन स्पर्धा : दुहेरीत भारतासाठी संमिश्र निकाल

Subscribe

चीनमध्ये सुरु असलेल्या जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेच्या मिश्र सामन्यात भारताच्या काही दुहेरी जोड्यांनी विजय मिळवला आहे. तर काही जोड्यांना मात्र पराभवाचा सामना करावा लागला आहे.

चीनच्या नानजिंगमध्ये सुरु असलेल्या जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेच्या मिश्र दुहेरी फेरीत भारतीय खेळाडूंनी उत्तम कामगिरी करत दुसरी फेरी गाठली आहे. मिश्र दुहेरीत सात्विक रणकीरेड्डी आणि अश्विनी पोनप्पा तर पुरुष गटात सात्विक रणकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांच्या जोडीने विजय मिळवला आहे. तर महिला गटात अश्विनी पोनप्पाने आणि सिक्की रेड्डी यांच्या जोडीने विजय मिळवला आहे. मात्र दुसरीकडे प्रणव जेरी चोप्रा आणि सिक्की रेड्डी तसेच रोहन कपूर आणि कुहू गर्ग यांच्या जोड्यांना मात्र पराभवाला सामोरे जावे लागले.

असे झाले सामने

मिश्र दुहेरी गटात सात्विक रणकीरेड्डी आणि अश्विनी पोनप्पा या भारतीय जोडीने जर्मन जोडी मार्क लॅम्सफस्स आणि इसाबेल हर्टरिच यांचा पराभव केला. रंगतदार झालेल्या या सामन्यात १०-२१, २१-१७, २१-१८ च्या फरकाने भारताने जर्मनीला पराभूत केले. तर दुसरीकडे दुहेरी पुरुष गटात सात्विक रणकिरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेती जोडी मार्कस एलिस आणि क्रिस लँग्रीज यांचा २१-१९, १२-२१, २१-१९ च्या फरकाने पराभव केला.

- Advertisement -

यासोबतच सात्विक रणकिरेड्डी सोबत पहिल्या सामन्यात विजय मिळवणाऱ्या आश्विनीने सिक्की रेड्डी सोबत खेळत चिआंग काई हसीन आणि हुंग शीश हान या जोडीचा १९-२१, २१-१०, २१-१७ असा पराभव करत पुढील फेरीत प्रवेश केला आहे. तर दुसरीकडे काही भारतीय जोडयांना मात्र पुढील फेरीत जाण्यात अपयश आले. त्यात प्रणव जेरी चोप्रा आणि सिक्की रेड्डी यांना २१-१६ आणि २१-४ च्या फरकाने हाफीज फैजल आणि ग्लोरिया या जोडीने पराभूत केले आहे. तर रोहन कपूर आणि कुहू गर्ग यांना २१-१२ आणि २१-१२ अशा फरकाने ख्रिस आणि गॅब्रिल यांनी पराभूत केले.

अशाप्रकारे आजचा दिवस भारतीय मिश्र दुहेरी सामन्यांसाठी महत्त्वाचा ठरला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -