घरक्रीडाजागतिक बॅडमिंटन स्पर्धा : किदम्बी श्रीकांत उपउपांत्यपूर्वफेरीत दाखल

जागतिक बॅडमिंटन स्पर्धा : किदम्बी श्रीकांत उपउपांत्यपूर्वफेरीत दाखल

Subscribe

भारताचा बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांतने दुसऱ्या फेरीतील सामन्यात स्पेनच्या पॅब्लो अॅबीयनाला मात देत स्पर्धेची उप-उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. श्रीकांतने ३ पैकी २ सेट जिंकत सामन्यात विजय मिळवला.

भारताचा बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांतने विजय मिळवण्याची मालिका कायम ठेवत स्पेनच्या पॅब्लो अॅबीयनाला नमवत जागतिक बॅडमिंटन स्पर्धेची उपउपांत्यपूर्वफेरी गाठली आहे. पहिल्या सामन्यात आयर्लंडच्या नहात न्युगेनचा पराभव करत श्रीकांतने दुसरी फेरी गाठली होती. आता दुसरी फेरी जिंकत श्रीकांत थेट उपउपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे.


असा झाला सामना 

श्रीकांतने स्पेनच्या पॅब्लो अॅबीयनाला ३ पैकी २ सेट्समध्ये मात देत विजय आपल्या नावे केला. पहिल्या सेटमध्ये श्रीकांतने २१-१५ च्या फरकाने विजय मिळवत सामन्यात १-० ची आघाडी घेतली. मात्र दुसऱ्या सेटमध्ये स्पेनच्या पॅब्लोने अप्रतिम खेळ दाखवत २१-१२ च्या फरकाने सेट जिंकत सामन्यात बरोबरी साधली. मात्र अखेरच्या सेटमध्ये श्रीकांतने आपला खेळ उंचावत २१-१४ च्या फरकाने सेट जिंकत सामना आपल्या नावे केला.

- Advertisement -

उप-उपांत्यपूर्व फेरीत मलेशियाच्या डॅरेन लिएवशी झुंज

श्रीकांतचा यानंतरचा उप-उपांत्यपूर्व फेरीतील सामना हा मलेशियाच्या डॅरेन लिएव विरूद्ध खेळवला जाणार आहे. श्रीकांतने आतापर्यंत स्पर्धेत चांगली कामगिरी केली असून त्याच्या पुढच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -