घरक्रीडाजागतिक बॅडमिंटन स्पर्धा : पी. व्ही. सिंधूची उपांत्यपूर्वफेरीत झेप

जागतिक बॅडमिंटन स्पर्धा : पी. व्ही. सिंधूची उपांत्यपूर्वफेरीत झेप

Subscribe

जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारताची सुवर्णकन्या पी. व्ही. सिंधूने उपउपांत्यपूर्वफेरीच्या सामन्यात दक्षिण कोरियाच्या सुंग जी ह्यूनला नमवत उपांत्यपूर्वफेरी गाठली आहे.

चीनच्या नानजिंगमध्ये सुरू असलेल्या जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारताची सुवर्णकन्या पी. व्ही. सिंधूने उपउपांत्यपूर्वफेरीच्या सामन्यात दक्षिण कोरियाच्या सुंग जी ह्यूनला मात देत उपांत्यपूर्वफेरी गाठली आहे. सिंधूने जी ह्यून हीला २१-१० आणि २१-१८ अशा सरळ दोन सेट्समध्ये नमवत उपांत्यपूर्वफेरी गाठली आहे. सिंधूसोबतच सायना आणि साईप्रणितनेही उपांत्यपूर्वफेरी गाठली आहे. दुसरीकडे मात्र भारताच्या किदम्बी श्रीकांतला पराभव पत्करावा लागला असून त्याचे स्पर्धेतील आव्हान मात्र संपुष्टात आले आहे.

असा झाला सामना

पी. व्ही. सिंधूने आणि सुंग जी ह्यून यांच्यातील सामना ४२ मिनीटे चालला असून सिंधूने सुरूवातीपासूनच सामन्यात आपले वर्चस्व कायम ठेवले. पहिल्या सेटमध्ये सिंधूने १०-२१ च्या फरकाने अगदी सहज विजय मिळवत सामन्यात १-० ची आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये ह्यून हीने चांगला संघर्ष दिला मात्र पी.व्हीच्या अप्रतिम खेळासमोर अखेर ह्यून हीला हार मानावी लागली आणि दुसरा सेटही सिंधूने १८-२१ च्या फरकाने आपल्या नावे केला. या सोबतच सिंधूने उपांत्यपूर्वफेरीत झेप घेतली आहे.

- Advertisement -


सायना आणि बी. साईप्रणितही उपांत्यपूर्वफेरीत दाखल

उपउपांत्यपूर्वफेरीच्या सामन्यात बी. साईप्रणितने डेन्मार्कच्या हँस-क्रिस्टियन विटिंगहसला २१-१३ आणि २१-११ अशा सरळ सेट्समध्ये पराभूत करत उपांत्यपूर्वफेरीत प्रवेश मिळवला तर दुसरीकडे सायनाने सलग ८ व्या वेळेस उपांत्यपूर्वफेरी प्रवेश मिळवला आहे. सायनाने थायलंडच्या रॅटचानोकला २१-१६, २१-१९ च्या फरकाने पराभूत करत उपांत्यपूर्वफेरी गाठली आहे.

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -