घरक्रीडाजागतिक बॅडमिंटन स्पर्धा : सुवर्णकन्या पी. व्ही. सिंधूची विजयी सलामी

जागतिक बॅडमिंटन स्पर्धा : सुवर्णकन्या पी. व्ही. सिंधूची विजयी सलामी

Subscribe

जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने इंडोनेशियाच्या फित्रीयानीला नमवत स्पर्धेत आपला पहिला विजय नोंदविला आहे. तर पुरूष गटात बी साईप्रणित विजयी झाला असून एच एस प्रणॉयला पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

चीनच्या नानजिंगमध्ये सुरु असलेल्या जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने आपल्या पहिल्या सामन्यात बुधवारी इंडोनेशियाच्या फित्रीयानीला नमवत स्पर्धेत विजयी शुभारंभ करत उपांत्यपूर्वफेरीत प्रवेश मिळवला आहे. तर पुरुष गटात बी साईप्रणितने स्पेनच्या लुइक एन्रीक पेनालव्हेरला नमवत श्रीकांतसोबत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.

अवघ्या ३५ मिनिटांत सिंधूने मारली बाजी!

भारताची सुवर्णकन्या पी. व्ही. सिंधू आणि इंडोनेशियाच्या फित्रीयानी यांच्यातील उपउपांत्यपूर्वफेरीच्या सामन्यात सिंधूने सरळ दोन सेट्समध्ये विजय मिळवला आहे. सामन्याची सुरुवात तशी चुरशीची झाली. पहिल्या सेटमध्ये सिंधू आणि फित्रीयानी या दोघींनी अप्रतिम खेळ दाखवला, मात्र सेटच्या अखेरीस २१-१४ च्या फरकाने सिंधूने सामन्यात विजयी आघाडी घेतली. यानंतर दुसऱ्या सेटमध्ये सिंधूने २१-९ अशा सहज सेटमध्ये विजय मिळवत सामना आपल्या नावे केला. या विजयावबरोबरच सिंधूने स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला आहे.

- Advertisement -

बी साईप्रणित विजयी तर एच एस प्रणॉय पराभूत

तर पुरुष गटात बी साईप्रणितने अवघ्या ३३ मिनिटांत स्पेनच्या लुइक एन्रीक पेनालव्हेरला पराभूत करत स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. साईप्रणितने २१-१८, २१-११ च्या फरकाने विजय मिळवत सामना आपल्या नावे केला, तर दुसरीकडे एच एस प्रणॉयला ब्राझिलच्या यगोर कोएल्होने ८-२१, २१-१६ आणि २१-१५ च्या फरकाने पराभूत केले आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -