घरक्रीडाजागतिक बॅडमिंटन स्पर्धा : बी. साईप्रणित दमदार विजयासह उपांत्यफेरीत दाखल

जागतिक बॅडमिंटन स्पर्धा : बी. साईप्रणित दमदार विजयासह उपांत्यफेरीत दाखल

Subscribe

जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरूष गटाच्या उपउपांत्यपूर्वफेरीच्या सामन्यात बी. साईप्रणितने डेन्मार्कच्या हँस-क्रिस्टियन विटिंगहसला पराभूत करत उपांत्यफेरी गाठली आहे. परंतु दुसरीकडे किदम्बी श्रीकांतला मात्र उपउपांत्यपूर्वफेरीच्या सामन्यात मलेशियाच्या डॅरेनने पराभूत केले आहे.

चीनच्या नानजिंगमध्ये सुरू असलेल्या जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा बॅडमिंटनपटू बी. साईप्रणितने डेन्मार्कच्या हँस-क्रिस्टियन विटिंगहसला उपउपांत्यपूर्वफेरीच्या सामन्यात पराभूत करत उपांत्यफेरी गाठली आहे. साईप्रणितने २१-१३ आणि २१-११ अशा सरळ सेट्समध्ये विटिंगहसला पराभूत करत सामन्यात विजय मिळवला आहे. दुसरीकडे मात्र भारताच्या किदम्बी श्रीकांतला पराभव पत्करावा लागला असून त्याचे स्पर्धेतील आव्हान मात्र संपुष्टात आले आहे.

असा झाला सामना

बी. साईप्रणितने अवघ्या ३९ मिनीटांत डेन्मार्कच्या विटिंगहसला पराभूत करत सामना आपल्या नावे केला आहे. सामन्याच्या सुरूवातीपासूनच साईप्रणितने सामन्यात आपला दबदबा कायम ठेवला होता. पहिल्या सेटमध्ये साईप्रणितने सुरूवातीपासूनच आक्रमक खेळ दाखवला आणि २१-१३ च्या फरकाने सेट आपल्या नावे केला. यानंतर दुसऱ्या सेटमध्ये साईप्रणितने आपला अप्रतिम खेळ कायम ठेवत २१-११ अशा सहज फरकाने सेट जिंकत सामनाही आपल्या नावे केला.

- Advertisement -

 सायनाही उपांत्यफेरीत दाखल

उपउपांत्यपूर्वफेरीच्या सामन्यात बी. साईप्रणितने डेन्मार्कच्या हँस-क्रिस्टियन विटिंगहसला २१-१३ आणि २१-११ अशा सरळ सेट्समध्ये पराभूत करत उपांत्यफेरीत प्रवेश मिळवला तर दुसरीकडे सायनाने सलग ८ व्या वेळेस उपांत्यफेरीत प्रवेश मिळवला आहे. सायनाने थायलंडच्या रॅटचानोकला २१-१६, २१-१९ च्या फरकाने पराभूत करत उपांत्यफेरी गाठली आहे.

saina nehwal and b. saipraneeth
सायना नेहवाल आणि बी. साईप्रणित
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -