जागतिक बॅडमिंटन स्पर्धा : सायना उपांत्यफेरीत दाखल

जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत भारताची फुलराणी सायना नेहवाल थायलंडच्या रॅटचानोक इन्टॅनॉनपराभूत करत उपांत्यफेरीत पोहोचली आहे. सायनाने सरळ २ सेट्समध्ये विजय मिळवत सामना आपल्या नावे केला आहे.

saina nehwal
सायना नेहवालचा आरोप

चीनमध्ये सुरु असलेल्या जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारताची फुलराणी सायना नेहवालने थायलंडच्या रॅटचानोक इन्टॅनॉन पराभूत करत थेट उपांत्यफेरीत प्रवेश मिळवला आहे. सायना पहिल्या सामन्यात तुर्कीच्या अली डेमीबर्गला पराभूत करत उपउपांत्यपूर्व फेरीत पोहोचली होती. सायनाने २१-१७, २१-८ अशा सरळ सेट्समध्ये अलीचा पराभव करत आपला पहिला विजय मिळवला होता. आजच्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात सायनाने २१-१६, २१-१९ च्या फरकाने विजय मिळवला आहे.

असा झाला सामना

सायना आणि रॅटचानोक यांच्यातील सामना ४७ मिनीटे चालला असून सामाना सुरूवातीपासूनच अटीतटीचा सुरू असलेला दिसून येत होता. पहिला सेटच्या काही मिनीटातच सायनाने आपला पहिला पॉइंट घेत सामन्यात आपले वर्चस्व प्रस्थापित केले. अटीतटीच्या पहिल्या सेटमध्ये सायनाने २१-१६ च्या फरकाने विजय मिळवत सामन्यात १-० ची आघाडी प्रस्थापित केली. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये रॅटचानोकने चांगली लढत दिली मात्र सायनाच्या अप्रतिम खेळासमोर रॅटचानोकची डाळ काही शिजली नाही आणि दुसरा सेटही सायनाने २१-१९ च्या फरकाने आपल्या नावे करत सामन्यात विजय मिळवला.

सायनाच्या नावे नवा रेकॉर्ड

भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायनाने एक नवा रेकॉर्ड सेट केला असून. सायना ही पहिली महिला ठरली आहे जी आतापर्यंत सलग ८ वेळा जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्वफेरीत पोहोचली आहे. यावेळी जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेच्या ऑफिशिअल पेजवरून सायनाचे अभिनंदन करणारी पोस्ट टाकली गेली आहे.


याविजयासहच सायनाने उपांत्यपूर्व फेरीत झेफ घेतली असून आता सायनानंतर पी. व्ही काय कामगिरी करेल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे.