घरक्रीडाजागतिक बॅडमिंटन स्पर्धा : समीर वर्मा पहिल्या सामन्यात विजयी

जागतिक बॅडमिंटन स्पर्धा : समीर वर्मा पहिल्या सामन्यात विजयी

Subscribe

जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी एच. एस. प्रणॉयनंतर समीरने फ्रान्सच्या लुकास कोरवीचा पराभव करत भारताची विजयी घौडदौड सुरू ठेवली आहे.

जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत पहिल्याच दिवशी भारतीय खेळाडूंनी उत्तम सुरुवात करत विजयी सलामी दिली आहे. एकीकडे एच. एस. प्रणॉयने विजय मिळवल्यानंतर समीर वर्मानेही अप्रतिम विजय मिळवत भारताची विजयी घौडदौड सुरू ठेवली आहे. समीरने फ्रान्सच्या लुकास कोरवीचा पराभव करत आपला पहिला विजय नोंदविला आहे.

असा झाला सामना 

मुळचा हैदराबादचा असणारा २३ वर्षीय समीर आपला जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील पहिला सामना खेळला. आपल्या पहिल्याच सामन्यात विजयाने सुरूवात करणाऱ्या समीरने याआधी स्वीस ओपन स्पर्धेत पहिले स्थान पटकावले आहे.  सामन्याच्या पहिल्या सेटमध्ये समीरने २१-१३ च्या फरकाने विजय मिळवत सामन्यात आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये २१-१० च्या फरकाने लुकासला नमवत समीरने दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळवला. यानंतर स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत समीरचा चीनच्या लिन डॅनशी सामना होणार आहे.

- Advertisement -

मिश्र दुहेरीचे सामने

तर दुसरीकडे मिश्र दुहेरीत सात्विक रणकिरेड्डी आणि आश्विनी पोनप्पा या भारतीय जोडीने डेन्मार्कच्या निकलस लोहर आणि सारा थयगेसेन या जोडीचा २१-९, २२-२० असा पराभव करत दुसर्‍या फेरीत प्रवेश केला. तसेच प्रणव जेरी चोप्रा आणि सिक्की रेड्डी या मिश्र जोडीनेही स्पर्धेत विजय सलामी दिली. त्यांनी चेक रिपब्लिकच्या जाकुब बीटमन आणि आल्झबेटा बसोवा या जोडीला २१-१७, २१-१५ असे पराभूत केले. यानंतर दिवसाच्या शेवटी झालेल्या सामन्यात रोशन कपूर आणि कुहू गर्ग यांनीही आपला पहिला सामना जिंकला. त्यांनी टोबी आणि रेचल होंडरिच या जोडीवर २१-१९, २१-६ असा विजय मिळवत पुढील फेरीत धडक मारली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -