घरक्रीडाफक्त एक पाऊल मागे - सिंधु अंतिम फेरीत

फक्त एक पाऊल मागे – सिंधु अंतिम फेरीत

Subscribe

बासेल,येथे सुरू असलेल्या जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात विजय मिळवत भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूने फायनलमध्ये धडक मारली. सिंधूने चीनच्या चेन यू फेई हिचा २१-७, २१-१४ अशी मात करीत सहज विजय मिळवला. पहिल्या सेटमध्ये सिंधूने आक्रमक खेळ करीत आघाडी घेतली. तिच्या आक्रमक खेळापुढे चीनची चेन यू फेई टीकाव धरू शकली नाही. त्यामुळे फेईने खेळात चुका केल्या. मध्यान्ह होईपर्यंत सिंधूने ११-३ अशी आघाडी घेतली. ब्रेकनंतर फेईने क्रॉस कोर्ट खेळत गुण प्राप्त केले. परंतु, तिला सिंधुने आघाडी घेण्याची संधीच दिली नाही.

सिंधूने स्मॅश आणि जबरदस्त कोर्ट कव्हरेज खेळत पहिला सेट आपल्या नावावर केला. दुसर्‍या सेटच्या सुरुवातीला फेईनेही आक्रमकता दाखवली तिने सिंधुला कडवी टक्कर दिली. त्यामुळे सामना बराच लांबला. ब्रेक होईपर्यंत सिंधूने ११-७ अशी आघाडी घेतली होती. चेन यू फेईने ही आघाडी बरोबरी करण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु, तिला यश आले नाही. अखेर सिंधूने दोन्ही सेटमध्ये फेईवरवर मात करीत दिमाखात फायनलमध्ये धडक मारली. सिंधूने सलग तिसर्‍यांदा फायनलमध्ये धडक मारली आहे. या विजयासह सिंधूचे या स्पर्धेतील रौप्यपदक पक्के झाले आहे. पण सिंधू या स्पर्धेतील ऐतिहासिक सुवर्णपदक पटकावते का, याकडे सर्व देशवासियांचे लक्ष लागून राहिले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -