भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया लढत आज रंगणार!

भारताची ऑस्ट्रेलियाविरूद्ध आज सर्वात मोठी सत्त्वपरिक्षा

विश्वचषकातील स्पर्धेत भारतीय संघ हा दूसरा सामना खेळणार आहे. ऑस्ट्रेलियाने अफगणिस्तान आणि वेस्टइंडिज विरूद्ध दोन्ही सामने यशस्वीरित्या जिंकले. भारताने फक्त एक सामना दक्षिण अफ्रिकेच्या विरूद्ध खेळला आणि त्यात यश मिळवत हा सामना जिंकला. दरम्यान भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ तगडे असल्याने आज होण्याऱ्या लढतीचा सामना रोमांचक ठरेल, यात शंका नाही.

भारतासमोर एक नवं आव्हान

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील दक्षिण आफ्रिकेविरूद्धचा पहिला सामना खेळल्यानंतर आता भारतासमोर एक नवं आव्हान समोर असणार आहे. विश्वचषकामध्ये भारतावर वर्चस्व गाजवणारा ऑस्ट्रेलियाचा संपुर्ण संघ आताच्या घडीला बिथरलेल्या अवस्थेत असला तरी, विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला आज म्हणजे रविवारी केनिंग्टन ओव्हल येथे भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता मोठ्या आव्हानाला सामोरे जायचे आहे.

दोन्ही संघात रंगणार चुरशीची लढत

यासोबतच, भारताला तिसऱ्यांदा विश्वविजेता बनविण्याच्या वाटेवरील पहिलं-वहिलं हे मोठे आव्हान आजच्या लढतीत मिळणार आहे. त्यामुळे या लक्षवेधी सामन्यात कर्णधार विराट कोहली आणि कोच रवी शास्त्री यांच्या डावपेचांची आज सत्त्वपरीक्षा असणार आहे. विश्वचषकातील पहिल्या सलामीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सहा गडी राखून पराभव केला. साधारण वर्षभर संघर्ष करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने गेल्या काही महिन्यांत आपली कामगिरीचा आलेख उंचावला आहे. विश्वचषक स्पर्धेतही अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिजविरुद्धचे सामने जिंकत ऑस्ट्रेलियाने आपण सहाव्यांदा विश्वचषकासाठी तयार असल्याचे दाखवून दिले आहे. त्यामुळे आज असणारा भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघातील चुरशीची लढत नेमकी कशी रंगेल हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे.

संघातील खेळाडू

भारत :

विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, महेंद्रसिंह धोनी, केदार जाधव, हार्दिक पंडय़ा, कुलदीप यादव, यजुर्वेद्र चहल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमरा, लोकेश राहुल, दिनेश कार्तिक, विजय शंकर, रवींद्र जडेजा.

ऑस्ट्रेलिया : आरोन फिंच (कर्णधार), जेसन बेहरेंड्रॉफ, अ‍ॅलेक्स केरी, नॅथन कोल्टर नाइल, पॅट कमिन्स उस्मान ख्वाजा, नॅथन लायन, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्ड्सन, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अ‍ॅडम झम्पा.

सामना क्रमांक १४

भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया

स्थळ : द ओव्हल स्टेडियम, लंडन
सामन्याची वेळ : दुपारी ३ वा.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स २,
स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १, स्टार स्पोर्ट्स हिंदी १.