घरक्रीडाWorld Cup 2019 : पहिल्याच सामन्यात इंग्लंडचा दणदणीत विजय

World Cup 2019 : पहिल्याच सामन्यात इंग्लंडचा दणदणीत विजय

Subscribe

बेन स्टोक्स (८९ धावा) आणि जोफ्रा आर्चर (३ विकेट्स) यांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर इंग्लंडने विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात द.आफ्रिकेला १०४ धावांनी पराभूत केले. हा विश्वचषक जिंकण्यासाठी प्रमुख दावेदार मानल्या जाणाऱ्या इंग्लंडने फलंदाजीत ८ विकेट गमावत ३११ धावा केल्या, तर द.आफ्रिकेला अवघ्या २०७ धावांवर रोखले.

इंग्लंडने दिलेल्या ३१२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना द.आफ्रिकेची सुरुवात अडखळती झाली. सलामीवीर हाशिम आमलाच्या डोक्याला चेंडू लागल्याने त्याला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. यानंतर फलंदाजीला आलेल्या एडन मार्करम (११) आणि कर्णधार फॅफ डू प्लेसिस (५) यांना वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने झटपट माघारी पाठवले. त्यामुळे द.आफ्रिकेची २ बाद ४४ अशी धावसंख्या झाली होती. क्विंटन डी कॉक आणि रॅसी वॅन डर डूसेन यांनी चांगली फलंदाजी करत तिसऱ्या विकेटसाठी ८५ धावांची भागीदारी केली. आयपीएलमध्ये दमदार प्रदर्शन केलेल्या डी कॉकने आपला चांगला फॉर्म कायम राखत ५८ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.

- Advertisement -

यानंतर धावांची गती वाढवण्याच्या नादात तो ६८ धावांवर बाद झाला. त्याला लिआम प्लंकेटने माघारी पाठवले. वॅन डर डूसेनने मात्र चांगली फलंदाजी सुरु ठेवत अर्धशतक केले, पण ५० धावांवरच त्याला आर्चरने बाद केले. यानंतर अँडिले फेहलुकवायो (२४) व कागिसो रबाडा (११) व्यतिरिक्त इतर फलंदाजांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही आणि द.आफ्रिकेचा डाव २०७ धावांत संपुष्टात आला. इंग्लंडकडून आर्चरने ३, तर प्लंकेट आणि स्टोक्सने प्रत्येकी २-२ विकेट घेतल्या.

क्रिकेट विश्वचषक २०१९ स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली आहे. यजमान इंग्लंड संघ विरुद्ध दक्षिण आफ्रिका असा हा सामना होत आहे. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय सार्थ ठरवत फिरकीपटू इम्रान ताहीरने पहिल्याच ओव्हरमध्ये आयपीएल गाजवणाऱ्या जॉनी बेअरस्टोला बाद केले. मात्र त्यानंतर इंग्लंडच्या संघाने सावध खेळी करत डाव सावरला आणि ८ विकेट्स गमावून ३१२ धावांचे आव्हान दिले. आजच्या सामन्यात इंग्लंडला मागच्या ४४ वर्षात जे जमले नव्हते ते त्यांनी आज केले.

- Advertisement -

यंद्याच्या १२ व्या विश्वचषकात पहिल्यांदाच इंग्लंडच्या संघातील चार फलंदाजांनी अर्धशतक झळकावले आहेत. पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट गमावल्यानंतर जेसन रॉय आणि जो रूटने डाव सांभाळला. जेसन रॉयने ५१ बॉलमध्ये अर्धशतक पुर्ण केले. तर रुटने ५६ बॉलमध्ये आपले अर्धशतक पुर्ण केले. त्यानंतर आलेल्या कर्णधार मॉर्गन आणि बेन स्टोक्सने देखील आपापली अर्धशतके पुर्ण केली. स्टोक्सने ७९ बॉलमध्ये ताबडतोब ८९ धावा केल्या.

दक्षिण आफ्रिकेतर्फे एन्गिडीने ३, इम्रान ताहीर २ आणि रबाडाने २ विकेट्स घेतल्या. तर फेलुक्वायोने १ विकेट घेतली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -